एक्स्प्लोर
Advertisement
कुलभूषण यांना मदत केल्याचा आरोप, गुंड उजैर बलोच पाक सैन्याच्या ताब्यात
नवी दिल्ली/ इस्लामाबाद : पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानने याप्रकरणी संपूर्ण जगाला अंधारात ठेवल्याने भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही पाकिस्तानवर दबाव येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्य दलाने आता कराचीचा कुख्यात डॉन उजैर बलोचला ताब्यात घेतलं आहे. त्याने कुलभूषण जाधव यांना हेरगिरीमध्ये मदत केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.
उजैरला ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानचे सैन्यदल अधिकारी जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. उजैरने पाकिस्तानची अतिशय गुप्त माहिती शत्रू राष्ट्रांना हस्तांतरीत केल्याचा दावा गफूर यांनी ट्वीटमधून केला आहे.
Uzair Baloch taken into military custody under Pakistan Army Act / Official Secret Act - 1923. (1 of 2)
— Maj Gen Asif Ghafoor (@OfficialDGISPR) April 11, 2017
On charges of espionage (leakage of sensitive security information to foreign intelligence agencies). (2 of 2) — Maj Gen Asif Ghafoor (@OfficialDGISPR) April 11, 2017तर पाकिस्तानच्या जिओ टीव्हीनेही दिलेल्या वृत्तात joint investigation team (JIT) ने आपल्या अहवालात उजैरने हेरगिरी केल्याचं म्हटलं आहे. या अहवालाच्या आधारेच उजैरवरही पाकिस्तानच्या सैनिकी न्यायालयात खटला चालवणार आहे. वास्तविक, उजैरला पाकिस्तानी रेंजर्सनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यातच अटक केली होती. पण दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सैन्य दलाने उजैरला आपल्या ताब्यात घेतलं. उजैरच्या माध्यमातून कुलभूषण जाधव गुप्तहेर असल्याचं सिद्ध करण्याचा पाकिस्तानी सैन्य दलाचा डाव असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. उजैरवर हत्या, गँगवॉर, पाकिस्तानविरोधी घडमोडीत सहभाग, असे आरोप आहेत. त्यातच उजैर हा बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांना मदत केल्याचाही दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यासाठी तो जाधव यांच्या संपर्कात असल्याचं सैन्य दलाचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात सैनिकी न्यायालयात खटला चालवण्यात येण्याची शक्यता आहे. कोण आहे उजैर बलोच? कराचीत जन्मलेल्या उजैरने आपल्या कारकीर्दीची सुरुवात राजकारणातून केली. त्याने स्थापन केलेल्या 'पिपल्स अवाम कमिटी'च्या माध्यमातून 2001 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. 2003 मध्ये कराचीतील कुख्यात डॉन अरशद पुपुने त्याच्या वडिलांची हत्या केल्यानंतर उजैर गुन्हेगारीकडे वळला. त्याचा भाऊ रहमान दाकितनं त्याला आपल्या गँगमध्ये सहभागी करुन घेतलं. लयारी गँगवारच्या घटनेनं त्याचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं. यानंतर उजैरने आपल्या विरोधी गँगना संपवून गुन्हेगारी जगतात स्वत: चा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. उजैरने कराची आणि इतर परिसरात आपल्या गँगची दहशत निर्माण केली होती. त्याला 2005 मध्ये सिंध पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली. पण राजकीय दबावामुळे त्याची सुटका करण्यात आली. त्याचे झुल्फिकार अली भुत्तोंच्या पाकिस्तान पिपल्स पक्षाची संबंध होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान गिलानींच्या कार्यकाळात त्याचा राजकीय क्षेत्रात वरचष्मा होता. मात्र, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये त्याला इंटरपोलच्या मदतीनं पुन्हा अटक करण्यात आली. तर जानेवारी 2016 मध्ये पाकिस्तानविरोधी कारवायांच्या आरोपाखाली त्याला सिंध पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याला अटक करुन जवळपास 15 महिन्यांचा कालावधी झाला आहे. पण या प्रदीर्घ काळानंतर त्याचं नाव कुलभूषण जाधव यांना हेरगिरीमध्ये मदत केल्याप्रकरणी जोडलं जात आहे. संबंधित बातम्या कुलभूषण यांच्याकडे फाशीविरोधात अपील करण्यासाठी 60 दिवस : पाकिस्तान सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी … तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी गंभीर परिणाम भोगण्यास तयार रहा, सुषमा स्वराज यांचा इशारा कुलभूषण जाधवांना सोडवण्यासाठी शक्य ते सर्व करु : राजनाथ सिंह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement