एक्स्प्लोर
8 देशातील नागरिकांना विमानात लॅपटॉपवर बंदी, अमेरिका, ब्रिटनचा निर्णय
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन फतवा काढला आहे. आठ मुस्लीमबहुल देशातून अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांना विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेसोबतच ब्रिटननेही हा निर्णय घेतला आहे. मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय कोर्टाने रद्द केल्यानंतर ट्रम्प यांनी नवा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 8 मुस्लीमबहुल देशातील 10 विमानतळांहून अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक उपकरणं लगेजमध्ये ठेवता येणार नाहीत. लॅपटॉप, टॅबलेट, कॅमेरा, किंडल आणि आयपॅड या उपकरणांवर प्रवासात बंदी घालण्यात आली आहे.
इजिप्तमधील कायरो विमानतळ, संयुक्त अरब अमीरातमधील दुबई आणि अबू धाबी विमानतळ, तुर्कीतील इस्तांबूल विमानतळ, कतरमधील दोहा, जॉर्डनमधील अम्मान, कुवैत, मोरक्कोतील कॅसाब्लांका, सौदी अरेबियामधील जेद्दा आणि रियाध विमानतळाहून अमेरिकेत जाताना इलेक्ट्रॉनिक उपकरणं प्रवासात बाळगता येणार नाहीत.
अमेरिकेनंतर ब्रिटननेही हा निर्णय घेतला आहे. तुर्की, लेबनान, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया आणि सौदी अरेबिया या सहा देशातील नागरिकांना ब्रिटनमध्ये जाताना विमान प्रवासात इलेक्ट्रॉनिक उपकरणं नेता येणार नाहीत.
दहशतवाद्यांकडून विमानाला लक्ष्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जातो. तसंच या उपकरणांमध्ये बॉम्बसारख्या वस्तू लपवता येतात. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेने निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित एअरलाईन्सला 96 तासांचा कालावधी दिला आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागेल. मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असल्याचं ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. अमेरिका, ब्रिटननंतर कॅनडाकडूनही असा निर्णय घेतला जाऊ शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement