एक्स्प्लोर

Sri Lanka PM Resigns : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा, पंतप्रधान कार्यालयाकडून वृत्ताचे खंडण

Sri Lanka PM Resigns : सरकार आणि राजकीय पक्षांमध्ये तत्काळ राजकीय स्थैर्य आणण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी राजीनामा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

 Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे पंतप्रधान (Sri Lanka PM Resigns )  महिंद्रा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द  केला आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडून राजीनामा अद्यापही स्विकारण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पंतप्रधान कार्यलयाकडून राजीनामाचे वृत्त फेटाळण्यात आले आहे. राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असून त्याच कोणतेही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. सरकार आणि राजकीय पक्षांमध्ये तत्काळ राजकीय स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आले आहे. 

श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे.  इंधन, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासनतास वीज खंडित झाल्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत श्रीलंकातील परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. या विरोधात नागरिकांकडून ठिकठिकाणी  निदर्शने करण्यात आली आहे.  राष्ट्रध्यक्षांच्या घराबाहेर देखील निषेध करण्यात आली आहे. 

 श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याच्याकडून देखील पत्रक जारी करत आर्थिक परिस्थिती बिघडल्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या काही लोकांनी जनतेचा विश्वास गमावल्याने त्यांनी सत्तेवरुन खाली उतरावे, असे वक्तव्य महेला जयवर्धने यांनी केले आहे.  श्रीलंकेतील समस्या मानवनिर्मित असून योग्य आणि पात्र लोकांकडून त्याचे निराकरण केलं जाऊ शकतं असं म्हणत सोशल माध्यमात पत्रक जारी केले आहे. 

देशात इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई 
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिलपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. जनता स्त्यावर उतरल्याने सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला. जनता संतप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे. श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोल, डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

पेट्रोलपेक्षा दूध महाग
देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे की, शिक्षण खात्याकडील कागद आणि शाई संपली आहे. त्यामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे येथे पेट्रोलपेक्षा दूध महाग झाले आहे.

संबंधित बातम्या : 

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत 36 तास कर्फ्यू, सोशल मीडिया साइट्सवर बंदी; जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aashish Hemrajani : Book My Showचे सीईओ आशिष हेमराजानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाABP Majha Headlines :  12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPhaltan : सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोनवरून केली उमेगवारीची घोषणाGovernment Employees :सेवानिवृत्ती उपदान 14 लाखांवरून  20 लाख करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Ajit Pawar : अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले, कारण...
अजित पवारांची स्मार्ट खेळी, भरसभेत फोनवरुन दीपक चव्हाणांना उमेदवारी, रामराजेंचा मूड बदलला
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Embed widget