एक्स्प्लोर

Sri Lanka Financial Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, अर्थव्यवस्था पुरती ढासळली; महागाईमुळे संतप्त जनतेकडून जाळपोळ

Sri Lanka Declares State Of Emergency : श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांनी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली आहे. महागाईमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरल्याने सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.

Sri Lanka Declares State Of Emergency : श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात हिंसाचार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आणीबाणी जाहीर केली.

जनतेकडून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रपती भवनाबाहेर शुक्रवारी हजारो नागरिकांनी निदर्शने केली. संतप्त लोक राष्ट्रपतींना पायउतार होण्याचे आवाहन करत आहेत. सध्याच्या सरकारची धोरणे आर्थिक परिस्थितीला कारणीभूत असल्याची नागरिकांती भावना आहे. तर कोलंबोमध्ये हिंसाचार सुरूच आहे. काही संतप्त लोकांनी रस्त्यावरील वाहने पेटवली. पोलिसांच्या गाड्याही जाळल्या.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर
आर्थिक संकटामुळे सुरक्षा दल आणि सामान्य जनता आमनेसामने आली आहे. सरकराच्या निषेधार्थ जनता रस्त्यावर उतरली आहे. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून फायर गॅस सोडण्यात आला. श्रीलंकेत आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 10 जण जखमी झाले आहेत. तर 50 हून अधिक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने स्पेशल टास्क फोर्सला पाचारण करावे लागले आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात येण्याचं नाव नाही.

देशात इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई 
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिलपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. जनता स्त्यावर उतरल्याने सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला. जनता संतप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे. श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोल, डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

पेट्रोलपेक्षा दूध महाग
देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे की, शिक्षण खात्याकडील कागद आणि शाई संपली आहे. त्यामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे येथे पेट्रोलपेक्षा दूध महाग झाले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget