Russia Ukraine War : देश सोडून चाललेल्या गर्लफ्रेंडला युक्रेनच्या सैनिकाचं प्रपोज, चेकपॉईंटवरच घडला प्रकार, व्हिडिओ व्हायरल
Russia Ukraine War : रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली. लाखो युक्रेनियन लोक देश सोडून शेजारच्या देशांत आश्रय घेत आहेत.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. या युद्धात युक्रेन जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. लाखो लोक देश सोडून गेले आहेत. दरम्यान, युक्रेनमधून एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये युक्रेनचा सैनिक आपल्या गर्लफ्रेंडला सरप्राईज देत तिला प्रपोज करत आहे. हा व्हिडिओ युक्रेनची राजधानी कीव्ह येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
चेकपॉईंटवर झडती सुरू असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. युक्रेनियन सैनिक चेकपॉईंट ओलांडणाऱ्या नागरिकांची तपासणी करत आहेत, त्यांची कागदपत्रे तपासत आहेत. ही महिला कारमधून उतरताच युक्रेनचा एक सैनिक त्याच्या गुडघ्यावर बसून महिलेला प्रपोज करतो. सैनिकाने हातात फुलांचा गुच्छ धरला आहे. हे सर्व पाहून महिलेला आश्चर्यचा धक्का बसला. मग दोघांनी मिठी मारली. दुसरीकडे, हे सर्व पाहून शेजारी उपस्थित लोक टाळ्या वाजवू लागले.
People on the border with #Ukraine assumed they are passing a check post, but one of the soldiers proposed to his girlfriend as she was leaving the country and he was staying behind to fight the Russian invasion pic.twitter.com/aRNtxTTRGT
— Belarus Free Theatre (@BFreeTheatre) March 7, 2022
दोन युक्रेनियन सैनिकांनी युद्धभूमीवर केले लग्न
याआधी युक्रेनच्या दोन सैनिकांनी युद्धभूमीवर लग्न केल्याची बातमी आली होती. त्याचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे. युक्रेनच्या सैनिक जोडप्याने लग्नगाठ बांधल्यानंतर या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. या लग्नाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे वधू आणि वर दोघांनीही त्यांच्या सैनिकांच्या गणवेशात लग्न केले. युक्रेनच्या संरक्षण दलाच्या 112 ब्रिगेडच्या दोन जवानांनी लग्न केले आहे. लेसिया आणि व्हॅलेरी अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही युक्रेनच्या 112 ब्रिगेडचे सैनिक असून, त्यांनी युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर सुरू असलेल्या युद्धादरम्यान लग्न केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Ukraine Russia War : 'मी कोणालाही घाबरत नाही', देश सोडण्याच्या बातम्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा व्हिडिओ, केला 'हा' दावा
- Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, कोरोनाबळी वाढले; गेल्या 24 तासात 3993 नवे रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha