Pi Day : गणितातली कोडी उलगडणारा पाय (π) हा दिन 14 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या
Pi Day : पाय (π) चा वापर केल्याशिवाय जगातली अनेक कोडी सुटत नाहीत. 3.14 किंमत असलेला π दिवस आजच साजरा करण्यामागे एक विशेष कारण आहे.
Pi Day : गणित आणि भौतिक तज्ज्ञांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज जागतिक स्तरावर विशेष म्हणजे अमेरिकेत Pi Day (π Day) साजरा केला जातो. पाय डे म्हटल्यावर तुमच्याही डोळ्यांसमोर गणिताचे आकडे आले असतील. अर्थात, हा तोच पाय आहे ज्याचा वापर केल्याशिवाय आपल्याला गणितं सोडवता येत नाहीत. पायची किंमत ही 22/7 किंवा 3.14 अशी आहे. आजच्याच दिवशी पाय दिवस का साजरा केला जातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, याचंही एक विशेष कारण आहे. आज मार्च महिना म्हणजे वर्षातला तिसरा महिना आणि 14 तारीख आहे. पायची किंमतही 3.14 अशी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पाय दिवस (Pi Day) साजरा केला जातो.
भौतिक शास्त्रज्ञ असलेल्या लॅरी शॉ यांनी सर्वप्रथम 1988 साली सॅन फ्रान्सिस्कोधील एक्सप्लोरेटोरियम मध्ये पाय दिवसाचे आयोजन केलं होतं. त्यांना “The Prince of π” या नावानेही ओळखलं जातं. 2009 साली संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या प्रतिनिधींनी 14 मार्च हा दिवस पाय दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. त्या आधी पाय दिवस हा जुलै महिन्याच्या 22 तारखेला साजरा करण्यात येत होता. पायची दुसरी किंमत ही 22/7 अशीही आहे.
π चा वापर कुठे आणि कसा केला जातो ?
नद्यांची लांबी मोजण्यासाठी पायचा उपयोग होऊ शकतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी पायचा वापर करुन नद्यांची लांबी मोजण्याचा प्रयत्न केला होता. पायचा वापर करुन गणिततज्ज्ञ पिरॅमिडचा आकार मोजला जातो. अवकाशातील दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी, त्यांच्यातील अंतराचा हिशोब लावण्यासाठीही पायचा उपयोग होऊ शकतो. पायच्या किंमतीचा वापर करुन आपण आपल्या ब्रम्हांडचा आकार अंडाकार आहे या तथ्यापर्यंत पोहोचलो आहे. स्पेस सायन्समध्ये π चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय.
पायची किंमत ही 22/7 म्हणजेच 3.141592653589793238..... अशी अनंत आहे. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी पाय च्या निश्चित मूल्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, अजून कुणालाही यश आलं नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Albert Einstein : अपयशानं हार मानू नका, अल्बर्ट आइनस्टाईन यांचे प्रेरणादायी विचार वाचा
- Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI