एक्स्प्लोर

Viral News: डॉक्टरही हैराण! लघवी करताना त्रास म्हणून या व्यक्तीने थेट...

Viral News : लघवीला त्रास होत असल्याने एका वृद्धाने लिंगावाटे मलमूत्रात 18 सेमी लांबीची इलेक्ट्रीक तार टाकली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Viral News : एका व्यक्तीने लघवी करताना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी विचित्र उपाय केला. या विचित्र उपायामुळे त्याची समस्या दूर तर झालीच नाही. मात्र, हा  उपाय जीवावर बेतला असता. या व्यक्तीला त्रास होऊ लागल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याने वस्तुस्थिती सांगितल्यावर डॉक्टरही हैराण झाले. लघवीला त्रास होत असलेल्या व्यक्तीने आपल्या लिंगात इलेक्ट्रीक केबल घुसवली होती. डॉक्टरांनी 18 सेमी लांबीची केबल काढली. 

पाकिस्तानमध्ये ही घटना घडली. ही घटना Urology Case Reports या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील 64 वर्षीय व्यक्तीला लघवीची समस्या होती. या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्याने डॉक्टरांऐवजी ऐवजी स्वत: उपाय योजला. त्याने जवळपास 18 सेमी लांब इलेक्ट्रीक केबल वायर मलमूत्र मार्गात ढकलली. मात्र ही वायर मलमूत्र मार्गात अडकली.  या घटनेनंतर त्याला कराचीतील अब्बासी शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अशी काढली वायर

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या लिंगाला स्पर्श केल्यानंतरही त्यात अडकलेली वायर जाणवत होती. एक्स-रे काढल्यानंतर ही वायर मलमूत्र नळीपासून ब्लॅडरपर्यंत पोहचली असल्याचे दिसून आले. या आधी डॉक्टरांनी तारेचे निरीक्षण करण्यासाठी मलमूत्र मार्गात एक कॅमेरा टाकण्याचा विचार केला होता. मात्र, त्या व्यक्तीच्या लिंगाजवळ वायरचा एक भाग दिसून आला. त्यानंतर डॉक्टरांनी चिमट्याच्या मदतीने ही वायर खेचून काढली. 

डॉक्टरांनी सांगितले की, या वायरची लांबी 18 सेमी इतकी लांब होती. ही वायर काढल्यानंतर त्या व्यक्तीला रक्तस्त्राव अथवा जखम झाल्याची कोणतीही समस्या जाणवली नाही. 

आरोग्याला गंभीर धोका

मलमूत्र मार्गात कोणतीही वस्तू अडकल्यास मोठा त्रास होऊ शकतो. यामध्ये जळजळ होण्यासह लघवी करताना त्रास जाणवू शकतो. काही गंभीर प्रकरणात मूत्राशयात एक लहानसे छिद्र करून मलमूत्र बाहेर काढण्याचा पर्याय डॉक्टरांकडून अवलंबला जातो. काही वेळेस एखादी वस्तू अडकल्यास शस्त्रक्रियादेखील करावी लागते. काही प्रकरणात मलमूत्राच्या नळीला बदलण्यात येते. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 24 June 2024Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget