(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Putin on Russia Ukraine War :'बाहेरील कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही, भीषण परिणामांना सामोरं जावं लागेल', अध्यक्ष पुतीन यांची धमकी!
Putin on Russia Ukraine War : बाहेरुन कुणीही हस्तक्षेप करण्याचा विचारही करत असतील त्यांना इतिहासात आत्तापर्यंत कुणीही भोगले नसतील अशा परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी थेट धमकी पुतीन यांनी दिली आहे.
Putin on Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव अखेर युद्धात बदलला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास रशियाने युक्रेनमध्ये हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई सुरु झाली. दरम्यान आता युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या मदतीला कोणते देश येतात, याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुतीन यांनी बाहेरुन कुणीही हस्तक्षेप केल्यास याचे गंभीर परिणाम होती, अशी धमकीच दिली आहे. पुतीन यांनी पश्चिमेकडील अमेरिका तसेच नाटोमधील देशांना उद्देशूनच ही धमकी दिल्याची चर्चा आहे.
रशियाने आपल्या महत्त्वाच्या मागण्यासांठी युक्रेनवर हल्ला केला असून युक्रेनही आपल्यापरीने याचा सामना करत आहे. दरम्यान अमेरिका तसंच नाटो (NATO) मधील इतर देश युक्रेनच्या पाठीशी असल्याचं याआधीच समोर आलं होतं. त्यानुसार आता अमेरिका कधी युद्धात उडी घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतीन म्हणाले,'बाहेरुन कुणीही हस्तक्षेप करण्याचा विचारही करत असतील, तर अशा हस्तक्षेप करणाऱ्यांना इतिहासात आत्तापर्यंत कुणीही भोगले नसतील अशा परिणामांना सामोरे जावे लागेल.'' पुतीन यांनी दिलेल्या या गंभीर धमकीचे परिणाम नक्की काय होणार? आणि युक्रेनच्या मदतीला कोणते देश येणार हे पाहावे लागेल.
रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यामागील मुख्य कारणे
1. रशिया आणि युक्रेनमधील वादाचे मूळ नाटो आहे. NATO म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरुवात 1949 मध्ये झाली. रशियासाठी नेहमीच समस्या असलेल्या युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांचे सैन्य आणि तळ त्याच्या सीमेजवळ येतील, असे रशियाला वाटते.
2. व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, युक्रेन आता सार्वभौम देश नसून पाश्चात्य देशांची कठपुतली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला: शेअर बाजारात गुंतवणूकदार होरपळले; 10 लाख कोटींचा फटका
- Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर हल्ला; पाहा विदारक परिस्थिती
- Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावरच हल्ला का केला? जाणून घ्या कारण...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha