(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jamal Khashoggi Killing : पत्रकार खाशोगी हत्या प्रकरणी सौदी अरबच्या राजपुत्राची निर्दोष मुक्तता, बायडन प्रशासनाचा यु-टर्न
Mohammed Bin Salman : अमेरिकेने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी ( Jamal Khashoggi ) यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेने सौदी अरबचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांची मुक्तता केली आहे.
Mohammed bin Salman : अमेरिकेने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी ( Jamal Khashoggi ) यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेने सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान (Saudi Crown Prince Mohammed bin Salman) यांची मुक्तता केली आहे. याआधी अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने इंटेलिजेन्स रिपोर्टच्या आधारे (US report) राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांना पत्रकार खाशोगीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं. मात्र आता बायडन प्रशासनाने यु-टर्न घेतला आहे. जो बायडन यांनी राजपुत्राविरोधात यासाठी जोरदार अभियानही चालवलं होतं.
बायडेन प्रशासनाने गुरुवारी जाहीर केलं की, सौदी अरेबियाच्या राजपुत्र आणि सध्याचे पंतप्रधान ( Saudi Arebia PM ) मोहम्मद बिन सलमान ( Mohammed Bin Salman ) यांच्या कार्यालयाने अमेरिकन पत्रकार खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात अमेरिकेने सौदी अरबचा राजपुत्राची मुक्तता करण्यात यावी, असं निवेदन केलं होतं. अमेरिकेच्या इंटेलिजेन्स रिपोर्टमध्ये खाशोगी यांच्या हत्येसाठी सौदी अरेबियाच्या राजपुत्राला जबाबदार ठरवलं होतं. मात्र अमेरिकन कोर्टाने म्हटलं आहे की, सौदी अरेबियाचे पंतप्रधान असल्यामुळे या प्रकरणातून त्यांची मुक्तता करण्यात येत आहे.
Saudi Arabian Crown Prince Mohammed bin Salman was granted immunity from a lawsuit over the murder of Jamal Khashoggi by the Biden administration. The move drew immediate condemnation from the slain journalist's former fiancée https://t.co/ERhDbJI1LF pic.twitter.com/d40QyygbDO
— Reuters (@Reuters) November 19, 2022
तुर्कीमध्ये खाशोगींची हत्या
वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात जमाल खाशोगी हे सौदी अरबवर एक कॉलम लिहायचे. आपल्या लेखनातून त्यांनी सौदी अरबचे राज्यकर्ते आणि राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर टिका केली होती. खाशोगी हे जेव्हा इस्तंबुलमधील गेले तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना 2018 साली घडली होती. खाशोगी यांच्या हत्येचा थेट संशय सौदी अरबचा राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर व्यक्त करण्यात येत होता.
इस्तंबुलमध्ये खाशोगींची हत्या करण्यात आली होती ती मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरुनच करण्यात आली होती, असं अमेरिकेने आधी म्हटलं होतं. मात्र आता सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना बायडेन प्रशासनाकडून जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे. या कारवाईचा खाशोगी यांच्या प्रेयसीकडून निषेध करण्यात आला आहे.