एक्स्प्लोर
Advertisement
लंडन कोर्टानं नीरव मोदीचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला
या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत नीरव मोदी कोठडीतच असणार आहे. पीएनबीला चुना लावून भारताबाहेर पळाल्यानंतर जानेवारी 2018 पासून नीरव मोदी लंडनमध्ये आहे.
लंडन : पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून पळालेल्या नीरव मोदीला लंडन कोर्टानं मोठा झटका दिला आहे. लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टानं नीरव मोदीचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणांसाठी हे मोठं यश मानलं जातं आहे.
कोर्टात भारताची बाजू मांडणारे टॉबी कॅडमन यांनी या प्रकरणातील एका साक्षीदाराला धमकी देण्यात आल्याची बाब कोर्टात मांडली. तसंच तो भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही. त्याला जामीन मिळाल्यानंतर सगळ्यात आधी तो देश सोडू शकतो. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करु नये अशी मागणी केली.
दरम्यान, नीरव मोदीच्या वकिलाने सुनावणीपूर्वी सांगितले की, ते प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करु. मात्र, यात त्यांना यश आले नाही. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाल्यानंतर यापूर्वी जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या कोर्टात पहिल्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. यावेळी भारताची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाला सांगितले होते की, नीरव मोदी सुमारे दोन अब्ज डॉलरच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भारताला हवा आहे. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याला कोर्टाने दणका दिला आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत नीरव मोदी कोठडीतच असणार आहे. पीएनबीला चुना लावून भारताबाहेर पळाल्यानंतर जानेवारी 2018 पासून नीरव मोदी लंडनमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement