US Inauguration Day 2021 | जो बायडन आज शपथ घेणार; अमेरिकेच्या अध्यक्षांचा पगार किती, सुविधा कोणत्या?
US Inauguration Day 2021 : जो बायडन आज अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. जो बायडन 46 वे राष्ट्रध्यक्ष म्हणून राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस शपथ घेणार आहेत.
US Inauguration Day 2021 : जो बायडन आज अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला पूर्णपणे छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सुरक्षा आणि शपथविधी सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून वॉशिंग्टनमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास 25 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. भारतीय वेळेनुसार, रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन आणि उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
शपथविधी सोहळ्या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण आराखडा बदलण्यात आला आहे. जो बायडन यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना राजधानीत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.
राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायजडन यांना पगार आणि इतर सर्व भत्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया राष्ट्रपती म्हणून बायडन यांचा पगारासंदर्भातील काही गोष्टी, तसेच त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत...
न्यूयॉर्कमधील एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा वार्षिक पगार जवळपास चार लाख अमेरिकन डॉलर इतका असणार आहे. जर भारतीय चलनात याचं मुल्य सांगायच झालं तर, जवळपास 2 कोटी 92 लाख रुपये. याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून 50 हजार डॉलर्सचा वार्षिक भत्ताही मिळतो. तसेच एक लाख डॉलर्सचा नॉन टॅक्सेबल प्रवासी भत्ताही दिला जातो.
अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मनोरंजनासाठी वार्षिक 19 हजार डॉलर्स देण्यात येतात. जर एखाद्या राष्ट्रपतींना आपला पगार दान करायची असेल तर तीदेखील करता येते. राष्ट्रपतींची पत्नी म्हणजेच, अमेरिकेची फर्स्ट लेडीला कोणताच पगार दिला जात नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :