Miss World 2021 : यंदाची मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना! मिस इंडिया टॉप 6 मध्येही स्थान मिळवू शकली नाही
Miss World 2021 : मिस इंडिया मनसा वाराणसी टॉप 13च्या यादीत प्रवेश केल्यानंतर टॉप 6 मध्ये ही स्थान मिळवू शकली नाही.
Miss World 2021 : मिस युनिव्हर्सचा (Miss Universe) खिताब भारतात आल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता होती ती मिस वर्ल्ड 2021 चा खिताब येण्याची... मात्र यंदाची मिस वर्ल्ड 2021 चा किताब पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का (Karolina Bielawska) हिने पटकावला आहे. तर मिस इंडिया मनसा वाराणसी (Miss India Mansa Varanasi) टॉप 13 च्या यादीत प्रवेश केल्यानंतर टॉप 6 मध्ये ही स्थान मिळवू शकली नाही.
97 देशांतील स्पर्धक सहभागी
यंदाची ही 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा होती. ज्यामध्ये 97 देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यापूर्वी 2020 मध्ये होणार होता, परंतु कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 मनसा वाराणसीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाची मिस वर्ल्ड 2021 ही पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का आहे. युनायटेड स्टेट्सची श्री सैनी ही पहिली उपविजेती आणि कोट डी'आयव्होरची ऑलिव्हिया येस ही दुसरी उपविजेती आहे. कॅरोलिनाने 17 मार्च (IST) रोजी सॅन जुआन, पोर्तो रिको येथे आयोजित मिस वर्ल्ड स्पर्धेची प्रतिष्ठित 70 वी आवृत्ती जिंकली.
मिस इंडिया टॉप 6 मध्ये स्थान मिळवू शकली नाही
मिस वर्ल्ड 2019 जमैकाच्या टोनी-अॅन सिंगने कॅरोलिना बिलाव्स्काला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. मिस इंडिया मनसा वाराणसी टॉप 13 च्या यादीत प्रवेश केल्यानंतर टॉप 6 मध्ये स्थान मिळवू शकली नाही. बाकी 6 स्पर्धक यूएसए, पोलंड, इंडोनेशिया, मेक्सिको, नॉर्दन आयर्लंड आणि कोटे डी'आयव्हॉरचे होते. त्यानंतर, कॅरोलिना बिलाव्स्काने अखेर मिस वर्ल्ड 2021 चा खिताब जिंकला. Missworld.com च्या मते, सध्या मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असलेल्या कॅरोलिनाला पीएचडी करण्याची इच्छा आहे. सध्या मॉडेल म्हणून काम करत असताना तिला मोटिव्हेशनल स्पीकर बनण्याची आशा आहे. तिला पोहणे आणि स्कूबा डायव्हिंग आणि टेनिस आणि बॅडमिंटन खेळणे आवडते. वाढत्या कोविड प्रकरणांमुळे मिस वर्ल्ड स्पर्धा ही दोन भागात आयोजित करण्यात आली होती. एक डिसेंबर 2021 मध्ये आणि पुन्हा मार्च 2022 मध्ये ठेवण्यात आली होती.
मानुषी मिस वर्ल्डचा मुकूट जिंकणारी सहावी महिला
यापूर्वी 2017 मध्ये मिस वर्ल्डचा मुकुट भारतात आला होता. मानुषी छिल्लरने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. मानुषी मिस वर्ल्डचा मुकुट जिंकणारी सहावी महिला होती. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अपंग आणि वंचित मुलांना मदत करण्यासाठी £250 दशलक्षपेक्षा जास्त निधी उभारला आहे आणि 100 हून अधिक देशांमध्ये फ्रेंचायझी आहेत. आता संपूर्ण भारताच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या होत्या
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Rail Vikas Nigam : रेल्वे विकास निगमकडून डिव्हिडंटची घोषणा, जाणून घ्या रेकॉर्ड डेट कधी?
- Digital Payment: लवकरच 'टाटा न्यू' डिजिटल पेमेंट अॅप होणार लॉन्च; गुगल पे, पेटीएमला टक्कर