एक्स्प्लोर

Digital Payment: लवकरच 'टाटा न्यू' डिजिटल पेमेंट अ‍ॅप होणार लॉन्च; गुगल पे, पेटीएमला टक्कर

Digital Payment Platform: अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) फोन पे (PhonePe) गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) या डिजिटल पेमेंट जगतात आता लवकरच स्पर्धा तीव्र होणार आहे.

Digital Payment Platform: अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) फोन पे (PhonePe) गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) या डिजिटल पेमेंट जगतात आता लवकरच स्पर्धा तीव्र होणार आहे. कारण मीठापासून ते स्टील उत्पादकापर्यंतचा आवाका असलेला अवाढव्य असा टाटा समूह आता डिजिटल पेमेंटच्या जगात पाऊल ठेवतो आहे. टाटा लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय (UPI) पेमेंट अ‍ॅप लॉन्च करू शकते. कंपनीला यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच कंपनी आपली युपीआय सेवा सुरू करू शकते.

एका अहवालानुसार, टाटा समूह देशात स्वतःची युनायटेड पेमेंट्स इंटरफेस आधारित डिजिटल पेमेंट सेवा ऑफर करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळवत आहे. टाटा समूहाने थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करण्यासाठी एनपीसीआयकडे अर्ज केला आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा टाटा समूहाचा विचार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आयसीआयसीआय बँकेशी (ICICI BANK) संवाद

टाटा ग्रुप (Tata Group) , त्यांच्या डिजिटल व्यावसायिक युनिट टाटा डिजिटलद्वारे, त्याच्या युपीआय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी चर्चा करतो आहे. युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म, जर एनसीपीआयने मंजूर केला तर, टाटा समूहाला त्यांच्या ग्राहकांसाठी ई-कॉमर्स अनुभव वाढविण्यात मदत होईल.

टाटा समूहाने या डिजिटल पेमेंट अ‍ॅपला 'टाटा न्यू' असे नाव दिले आहे आणि अशी अपेक्षा आहे की समूह पुढील महिन्यात आयपीएल सत्र (IPL 2022) दरम्यान त्याचे अॅप लॉन्च करू शकेल. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना सर्व टाटा डिजिटल अॅप्स जसे की Bigbasket, 1MG, Croma, Tata Cliq आणि Tata Group च्या फ्लाइट बुकिंग सेवा एकाच अॅपमध्ये सहज प्रवेश देईल. तज्ञांच्या मते, टाटा डिजिटलची घोषणा 7 एप्रिल रोजी केली जाऊ शकते.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

UPI Payment : UPI पेमेंट्सचा वापर करताय, मग 'या' गोष्टीकडे द्या लक्ष

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
Gold Silver Rate: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?
बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पाच दिवसांचा आठवडा होणार? उच्चस्तरीय समितीची स्थापना, अंतिम निर्णय कधी?

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्रं सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्रं सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Embed widget