Rail Vikas Nigam : रेल्वे विकास निगमकडून डिव्हिडंटची घोषणा, जाणून घ्या रेकॉर्ड डेट कधी?
Rail Vikas Nigam : रेल्वे विकास निगमने (RVNL) आर्थिक वर्ष 2021-22 साठी ₹ 1.58 प्रति शेअर (म्हणजे 15.80%) प्रति शेअर 10 रुपये अंतरिम लाभांश (Interim Dividend Payment) जाहीर केला आहे.
Rail Vikas Nigam Declares Interim Dividend : रेल्वे विकास निगमने (RVNL) आर्थिक वर्ष 2021-22 साठी दहा रुपयांच्या प्रति शेअरवर 1.58 रुपये (15.80% ) अंतरिम लाभांश (Interim Dividend Payment) जाहीर केला आहे. बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) रेल्वे विकास निगमचे शेअर्स 1% पेक्षा जास्त घसरून 33.15 रुपयांवर बंद झाले. 25 ऑक्टोबर 2021 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या शेअर 44.80 रुपयांचा उच्चांक गाठला. त्यानंतर हा स्टॉक सातत्याने घसरला. 24 मार्च 2020 रोजी म्हणजे कोरोना कालावधी दरम्यान स्टॉकने 10 रुपयाचा नीचांक गाठला होता.
अंतरिम लाभांश भरण्यासाठी भागधारकाची पात्रता निश्चित करण्यासाठी शुक्रवार, 25 मार्च 2022 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की अंतरिम लाभांश पेमेंट 14 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केले जाईल.
या वर्षी शेअर्स 7% पर्यंत घसरले
2022 मध्ये (वर्ष ते तारीख किंवा YTD), हा PSU रेल्वे स्टॉक आतापर्यंत सुमारे 7% ने घसरला आहे, तर एका वर्षाच्या कालावधीत स्टॉक 8% पेक्षा जास्त वाढला आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही एक PSU कंपनी आहे जी रेल्वे पायाभूत सुविधांच्या बांधकामात गुंतलेली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सरकारकडे रेल्वे कंपनीत 78.2% हिस्सा आहे.
तिसर्या तिमाहीत (Q3) रेल्वे विकास निगमचा एकत्रित निव्वळ नफा 4% वाढून ₹293 कोटी झाला आहे, तर डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत त्याची विक्री वार्षिक 35% वाढून (YoY) ₹5,049 कोटी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
JanDhan Account : जन धन खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! लवकर खातं उघडा, दर महिन्याला 3000 रुपये मिळणार...
Income Tax : 136 कोटी लोकसंख्येच्या देशात किती लोक प्राप्तीकर भरतात? सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
Digital Payment: लवकरच 'टाटा न्यू' डिजिटल पेमेंट अॅप होणार लॉन्च; गुगल पे, पेटीएमला टक्कर
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live