Johnson and Johnson Baby : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पॉवडरची विक्री बंद होणार, कंपनीचा मोठा निर्णय, कारण काय?
Johnson and Johnson Baby : मागील दोन दशकापेक्षा अधिक काळ वापरल्या जाणाऱ्या पॉवडरची विक्री 2023 पासून बंद करण्यात येत असल्याचं कंपनीने गुरुवारी सांगितलंय.
Johnson and Johnson Baby : बातमी आहे आपल्या घरातील लहान बाळासाठी (baby products) वापरण्यात येणाऱ्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन (Johnson and Johnson) बेबी पावडरची. आता मागील दोन दशकापेक्षा अधिक काळ वापरल्या जाणाऱ्या पॉवडरची विक्री 2023 पासून बंद करण्यात येत असल्याचं कंपनीने गुरुवारी सांगितलंय. जगभरात वापरलं जाणार हे बेबी पॉवडर असं अचानक बंद का केलाय जाताय? याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
घरी लहान मुल असेल तर जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचे बेबी पावडर (Johnson and Johnson) हे असणारच. जगभरातील अनेक पालकांचा विश्वास या पावडरवर (baby products) आहे. पण ह्याच पावडरची विक्री 2023 पासून जगभरात बंद केली जाणार आहे, तसा निर्णय कंपनीने गुरुवारी घेतला आहे. याच उत्पादन अचानक बंद केलं जात आहे, याचं कारण म्हणजे यावर उपस्थित प्रश्नचिन्ह हे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पावडरमुळे कर्करोग होत असल्याचे आरोप केले जात आहेत. अमेरिका व इतर देशात जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या पावडरवर आरोप केला गेलाय
काय आहे प्रकरण...?
2020 मध्ये बेबी पावडरमध्ये एस्बेस्टस नावाचा हानिकारक घटक सापडला असल्याची माहिती अमेरिकेत समोर आली. या एस्बेस्टस घटकामुळे कर्करोग होऊ शकतो. तब्बल 35 हजार महिलांनी या पावडरमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी अमेरिकेच्या एका न्यायालयाने कंपनीवर 15 हजार कोटींचा दंड ठोठावला असल्याची माहिती आहे. यामुळे अमेरिका आणि कॅनडामध्ये कंपनीने पावडरची विक्री थांबवली होती. मात्र कंपनीने त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच काय तर कंपनीच्या म्हणण्यानुसार, विक्री घटल्याने , जगभरात हे उत्पादन बंद करण्यात येत असल्याचे सांगितल जातंय.
कंपनीकडून आरोपांचं वारंवार खंडन -
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीनं त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाचं वारंवार खंडन केलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की, त्यांच्या उत्पादनामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही घटक नाहीत. पावडरमधील सर्व घटक सुरक्षित आहेत.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचं काय म्हणणं ?
जगभरातील आमच्या बेबी प्रोडक्ट्सचं मुल्यांकन केल्यानंतर आम्ही 2023 मध्ये जागतिक स्तरावर पावडरची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या दीर्घकालीन वाढीसाठी आमच्या प्रोडक्ट्सचं आम्ही नेहमीच मूल्यांकन आणि ऑप्टिमाइझ करतो. यामुळेच ग्राहकांचा विश्वास टिकून राहण्यास मदत झाली. आमचे बेबी प्रोडक्ट्सचं जागतिक स्तरावर विकले जात आहेत. ग्राहकांसाठी आम्ही नेहमीच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळेच JOHNSON’S® उत्पादने पालकांना आणि कुटुंबियांना पुढील अनेक वर्षे आवडतील याची खात्री आहे. कॉस्मेटिक टॅल्कच्या सुरक्षिततेबद्दल आमची स्थिती अपरिवर्तित आहे. आमची सर्व उत्पादने सुरक्षित आहेत. आमची बेबी पावडरही सुरक्षित आहे, त्यात एस्बेस्टोस नाही आणि त्यामुळे कर्करोग होत नाही.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पॉवडर संदर्भात होणारे गंभीर आरोप असू द्या, किंवा विक्री घटल्याने उत्पादन थांबवण्याचे कंपनीने दिलेले कारण असू द्या..मात्र दोन दशकांपासून घराघरात दिसणार जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पावडरची विक्री पुढील वर्षीपासून कायमची बंद होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या