FD Rates Hikes : 'या' दोन खाजगी बँकांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! FD च्या व्याजदरात वाढ, चेक करा लेटेस्ट रेट्स
Fixed Deposit Rates : कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.25 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन दर कालपासून म्हणजेच, 10 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत.
Fixed Deposit Rates : कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि येस बँकेच्या (Yes Bank) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी. दोन्ही बँकांनी त्यांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेनं त्यांच्या वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेनं आपल्या 2 कोटींपेक्षा कमी ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बँक 7 ते 10 वर्षांच्या FD वर 2.50 टक्के ते 5.90 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन दर 10 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.
देशातील आणखी एक मोठी खाजगी क्षेत्रातील बँक म्हणजेच, येस बँक. येस बँकेनंही आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडींवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.25 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन दर कालपासून म्हणजेच, 10 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. या नवीन दरांबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
कोटक महिंद्रा बँकेचे एफडी रेट्स (2 कोटींहून कमी) :
- 7 ते 14 दिवस : 2.50%
- 15 ते 30 दिवस : 2.65%
- 31 ते 45 दिवस : 3.25%
- 46 ते 90 दिवस : 3.25%
- 91 ते 120 दिवस : 3.75%
- 121 ते 179 दिवस : 3.75%
- 180 दिवस : 5.00%
- 181 ते 269 दिवस : 5.00%
- 270 दिवस : 5.00%
- 271 ते 363 दिवस : 5.00%
- 364 दिवस : 5.25%
- 365 ते 389 दिवस : 5.75%
- 391 दिवस ते 23 महीने- 5.85%
- 23 महिने : 5.85%
- 23 महीने ते 2 वर्ष : 5.85%
- 2 ते 3 वर्ष : 5.85%
- 3 ते 4 वर्ष : 5.90%
- 4 ते 5 वर्ष : 5.90%
- 5 ते 10 वर्ष : 5.90%
येस बँकेचे एफडी रेट्स (2 कोटींहून कमी) :
- 7 ते 14 दिवसांची एफडी : 3.25%
- 15 ते 45 दिवसांची एफडी : 3.70%
- 46 ते 90 दिवसांची एफडी : 4.10%
- 3 ते 6 महीन्यांपर्यंत : 4.75%
- 6 ते 9 महीन्यांपर्यंत : 5.50%
- 9 ते 12 महीन्यांपर्यंत : 5.75%
- 1 ते 18 महीन्यांपर्यंत : 6.25%
- 18 महीने ते 3 वर्षांपर्यंत : 6.75%
- 3 ते 10 वर्षांपर्यंत : 6.75%
अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले
RBI च्या रेपो दरांत वाढ झाल्यापासून अनेक बँकांनी त्यांच्या FD व्याजदरात सातत्यानं वाढ केली आहे. RBI च्या 5 ऑगस्ट रोजी झालेल्या आढावा बैठकीत देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली. यापूर्वी मे आणि जून महिन्यातही आरबीआयनं रेपो दरांत वाढ केली होती. सध्या रेपो दर 5.40 टक्के आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर बंधन बँक (Bandhan Bank), कॅनरा बँक (Canara Bank), इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) अशा अनेक बँकांच्या एफडी व्याजदरात सातत्यानं वाढ करण्यात आली आहे.