Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Shivsena Shinde Group And BJP BMC Election 2025 मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि भाजपामध्ये (BJP) जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 18 डिसेंबर झालेल्या भाजपा आणि शिवसेनेच्या बैठकीत भाजपाने 102 जागांवर दावा केला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने 109 जागांवर दावा केला. (Devendra Fadnavis-Eknath Shinde)
भाजपाने 2017 ला जिंकलेल्या सर्व 82 जागांवर दावा केला आहे. तर भाजपाने 2017 ला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवरही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून 109 जागांवर दावा करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा जशाच्या तशा मागितल्या आहेत. (BMC Election 2025)
उर्वरित 77 जागांवर दोन्ही पक्षांचा दावा- (Shivsena Shinde Group And BJP)
211 पैकी 150 जागांवर दोघांची सहमती झाली असून त्यात 102 जागा भाजपाकडे आणि उर्वरित शिवसेनेकडे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान उर्वरित 77 जागांवर दोन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे. शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनाच एकमेव आधार मानण्यास भाजपाने नकार दिला आहे, कारण अनेक प्रभागातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे, असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे.





















