एक्स्प्लोर
Advertisement
इराणचं अमेरिकेला जशास तसं उत्तर, अमेरिकन नागरिकांना इराणमध्ये 'नो एंट्री'
तेहरान: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लीमबहुल देशांतील नागरिकांवर अमेरिकेत येण्याची बंदी घातल्यानंतर, इराणनेही अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. इराणनेही अमेरिकन नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी यासंदर्भात माहिती दिली असून, अमेरिकेचा निर्णयाबाबत संताप व्यक्त केला आहे.
इराणच्या सरकारी न्यूज चॅनेलने परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त प्रसारीत केलं आहे. यामध्ये 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण'ने इराणच्या नागरिकांविरोधात अमेरिकेने घेतलेल्या निर्बंधांचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'जोपर्यंत इराणवर घातलेली बंदी अमेरिका हटवत नाही, तोपर्यंत इराणदेखील आपल्या देशात अमेरिकन नागरिकांना प्रवेश करण्याचा अधिकार देणार नाही.' असं इराणच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे.
ट्रम्प यांनी गेल्या शुक्रवारी एका अध्यादेशावर सही करुन मुस्लीमबहुल सात देशातील नागरिकांना अमेरिकेत बंदी घातली. यामध्ये इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन आदी देशांचा यात समावेश होता. हे सातही देश मुस्लीमबहुल असल्याने कट्टर इस्लामिक दहशतवादापासून अमेरिकेला वाचवण्यासाठी अमेरकेने हा निर्णय घेतल्याचं यावेळी सांगण्यात येत होतं.
यावर इराणच्या परराष्ट्र खात्यानं संताप व्यक्त करुन हा निर्णय बेकायदेशीर, विसंगत आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचं म्हणलं आहे. त्यामुळे जोपर्यंत अमेरिका हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत अमेरिकन नागरिकांनाही आपल्या देशात प्रवेश करु देणार नाही. याशिवाय, इराणने आपल्या दूतावासाला अमेरिकेत आडकलेल्या सर्व नागरिकांची मदत करण्याचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान, तेहरानमधील एका ट्रॅव्हल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी विमान कंपन्यांनी अमेरिकेत जाणाऱ्या विमानांमध्ये इराणी नागरिकांना प्रतिबंध घालण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या
डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानवरही बंदी घालणार?
मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प
ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणावर फेसबुक, गुगल, अॅपलचं टीकास्त्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement