Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाब विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, महिलांकडून हिजाब जाळत निषेध, अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद
Mahsa Amini Death : इराणमध्ये सध्या हिजाब विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. ठिकठिकाणी महिलांकडून हिजाब जाळत निषेध करण्यात येत आहे.
Iran Hijab Protest : इराणमध्ये (Iran) सध्या हिजाब विरोधी चळवळ सुरु आहे. इराणमधील महिलांकडून यासाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. इराणमध्ये हिजाब न घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिलांनी पोलिसांविरोधी भूमिका घेत आंदोलन करण्यास सुरुवात केली. महिलांकडून ठिकठिकाणी हिजाब जाळत निषेध करण्यात येत आहे.
इराणमध्ये हिजाब विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण
इराणमध्ये हिजाब न घातल्यामुळे पोलिसांनी महसा अमिनी नावाच्या महिलेला अटक केली होती. पोलिसांच्या अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू (Mahsa Amini Death) झाला. त्यानंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्यान इराणच्या राष्ट्रपती इब्राहीम रईसी (Ebrahim Raisi) यांनी महसा अमिनी यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडे शोक व्यक्त केला आहे. पण राष्ट्रपतींनी या हिजाब विरोधी या निदर्शनाला इराणच्या विरोधकांचा सुनियोजित कट असल्याचं म्हटलं आहे.
ठिकठिकाणी महिलांकडून हिजाब जाळत निषेध
हिजाब विरोधी आंदोलनामुळे इराणमध्ये सध्या वातावरण तापलं आहे. महिलांकडून हिजाब जाळत सरकारचा निषेध आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. अनेक परिसरात यामुळे तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
इराणमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. एका ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दिवांदरेह शहरात आंदोलकांनी पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. इराणच्या कुर्दिश प्रदेशातील हा भाग आहे. याच भागात हिजाबच्या विरोधात सर्वाधिक निदर्शनं करण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या