(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monkeypox : नायजेरियामध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी, 21 रुग्ण सापडले
Monkeypox In Nigeria : नायजेरियामध्ये सप्टेंबर 2017 मंकीपॉक्स रोगाचा अधिक प्रसार झालेला नाही. 2017 वर्षापासून 36 राज्यांमध्ये 247 रुग्ण सापडले आहेत.
Monkeypox Patient Death In Nigeria : नायजेरियामध्ये (Nigeria) मंकीपॉक्स (Monkeypox) रोगाचा पहिला बळी गेला आहे. रोग नियंत्रण विभागाने ही माहिती दिली आहे. नायजेरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) ने रविवारी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या वर्षी 66 संशयित रुग्ण सापडले होते. त्यामधील 21 रुग्ण मंकीपॉक्सचे असल्याची नोंद झाली आहे. नायजेरियासह पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत या रोगाचा प्रसार झाला आहे. नायजेरियात मंकीपॉक्समुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सप्टेंबर 2017 पासून रोगाचा प्रसार स्थानिक पातळीवर
नायजेरियामध्ये सप्टेंबर 2017 पासून मंकीपॉक्स रोग मोठ्या प्रमाणावर पसरलेला नाही. पण याची काही प्रकरणं समोर येत आहेत. सीडीसीनं म्हटलं आहे की, 2017 पासून 36 पैकी 22 राज्यांमध्ये किमान 247 प्रकरण आढळली आहेत. यामध्ये मृत्यू दर 3.6 टक्के आहे.
युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने इतर अनेक देशांमध्येही चिंता वाढली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नं सांगितलं आहे की, 20 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाला आहे. जगभरात या रोगाचे सुमारे 200 रुग्ण आढळले आहेत. आफ्रिकेबाहेर मंकीपॉक्सचे इतके रुग्ण यापूर्वी कधीच आढळले नव्हते.
नायजेरियातून ब्रिटनमध्ये गेलेल्या व्यक्तीला संसर्ग
नायजेरियातून ब्रिटनला गेलेल्या एका व्यक्तीला 4 मे रोजी मंकीपॉक्स रोगाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. या ब्रिटिश नागरिकाने देश सोडल्यानंतर नायजेरियामध्ये मंकीपॉक्सच्या सहा प्रकरणांची नोंद झाली. सीडीसीचे प्रमुख डॉ. इफेडायो अदेतिफा यांनी सांगितले की, नायजेरियामध्ये ब्रिटीश नागरिकाला संसर्ग झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. नायजेरिया मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी तयार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Monkeypox RTPCR Kit : मंकीपॉक्स तपासणीसाठी भारतीय कंपनीचं RT-PCR किट, एका तासात मिळणार रिपोर्ट
- Monkeypox : कोरोनानंतर आता नव्या ‘मंकीपॉक्स’ विषाणूचा शिरकाव, काय आहेत ‘या’ विषाणूची लक्षणे? जाणून घ्या...
- Monkeypox Virus : मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट; महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी