(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer Protest : शेतकरी आंदोलनावर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, मतभेद चर्चेतून दूर होऊ शकतात
अमेरिकेने भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
वॉशिंग्टन : शेतकरी आंदोनलनाला ग्लोबल सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असताना अमेरिकेने आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे. अमेरिकेने असं म्हटलं आहे की, जगातील बाजारावर नव्या कृषी कयद्यामुळे प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात. अमेरिकेने म्हटलं की भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्यांचे स्वागत आहे.
परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, बायडेन सरकार कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या निर्णयाचे समर्थन करते. नवीन कृषी कायदे खासगी गुंतवणुकीस आकर्षित करतात आणि शेतकर्यांसाठी अधिकाधिक बाजारपेठांना आकर्षित करु शकतात. अमेरिकेने भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, अमेरिका भारतातील पक्षांतर्गत मतभेदांचे निराकरण करण्याच्या बाजूने आहे. शांततेत निषेध करणे ही कोणत्याही लोकाशाहीच्या भरभराटीची वैशिष्ट्य आहे आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयानेही असं म्हटले आहे.
अमेरिकेतील अनेक नेत्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
एकीकडे अमेरिकेतील नवीन बायडन सरकार भारत सरकारला पाठिंबा देताना दिसत आहे तर अनेक अमेरिकन भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अमेरिकन कॉंग्रेसचे हेली स्टीव्हन्स म्हणाल्या की, नवीन कृषी कायद्यांविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणार्यांविरूद्ध कारवाई केल्याबद्दल मला काळजी वाटते. याखेरीज इतरही नेते शेतकरी आंदोलकांच्या बाजूने दिसले.
संबंधित बातम्या