एक्स्प्लोर

Mia Khalifa on Farmer Protest: मिया खलिफाचा शेतकऱ्यांना पाठिंबा, म्हणाली...

Mia Khalifa on Farmer Protest: पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्या नंतर आता मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. मियानं एक फोटो शेअर करत मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं म्हटलं आहे.

Farmer Protest : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी सुमारे 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आता जागतिक सेलिब्रिटीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्या नंतर आता मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. मियानं एक फोटो शेअर करत मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं म्हटलं आहे.

काय म्हणाली मिया खलिफा 

मिया खलिफानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं असून त्यात म्हटलं आहे की, मानवाधिकाराचं इथं उल्लंघन होत आहे. नवी दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट बंद केलं आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये तिनं काही कलाकारांना टार्गेट करत म्हटलं आहे की, पेड अॅक्टर्स... मला खात्री आहे की, पुरस्कारांच्या मोसमात यांच्या नावाला डावललं जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असं तिनं म्हटलं आहे.

पॉप स्टार रिहाना काय बोलली?

खरं तर, कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली. ही बातमी शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या जागेभोवती इंटरनेट बंद करण्याविषयी होती. रिहानाने ही बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest या हॅशटॅगसह हे ट्वीट केले."

ग्रेटा थनबर्ग काय म्हणाली?

रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत." ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित केले होते. ग्रेटा चर्चेत आली होती ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ग्रेटाचा शाब्दिक चकमक झाली होती.

पॉपस्टार रिहानाच्या ट्वीटवर भडकली कंगना

कंगनाने ट्वीट केले, "या विषयावर कोणी बोलत नाही कारण आंदोलन करणारे शेतकरी नसून आतंकवादी आहे. जे भारताच्या एकतेला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे चीन आपल्या देशावर हल्ला करेल आणि अमेरिकेसारखी चायनीज कॉलनी बनवेल. शांत रहा आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही जो आपला देश विकू"

दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाजीपूर या तीन सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त वाढवला आहे. टिकरी सीमेवर रस्त्यावर मोठे खिळे पसरल्यानंतर प्रशासनाने सिंघू सीमेवर सिमेंटच्या सहाय्याने बॅरिकेट्स जोडून भिंत तयार केली आहे. गाझीपूर सीमेवर काटेरी तार बसवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरु आहे तिथे इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget