Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांनी आजतागायत केलेल्या कामाची एक प्रकारे पोच पावती त्यांना भारत सरकारने दिली आहे, भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी देखील अच्युत पालव यांच्या घरी जात त्यांना शुभेच्छा दिल्या, शाळेतल्या फळ्यावर सुविचार लिहिण्यापासून सुरू झालेला पालव यांचा प्रवास पद्मश्री पर्यंत पोचला आहे, या आधी देखील विदेशातील प्रतिष्ठित कला संग्रहालयात त्यांच्या कलेला स्थान मिळाले आहे, भारतातील प्रत्येक भाषेची लिपी त्यांनी वेगळ्या पद्धतीने लिहून, अक्षरांना बोलते केले आहे, त्यामुळे आज त्यांनी पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, सोबतच येणाऱ्या पिढीला अक्षर ओळख व्हावी, लेखनात स्वारस्य निर्माण व्हावे म्हणून देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी....