एक्स्प्लोर

Rihanna Farmer Protest Comment: परराष्ट्र मंत्रालयाकडून रिहाना, ग्रेटा यांना सल्ला, तर अक्षय कुमार म्हणतो..

Farmers Protest: शेतकरी विधेयकाविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच आहे. पॉप स्टार रिहानाने सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले आहे. आता अक्षय कुमारनेही या वादात उडी घेतली आहे. यावर अक्षय कुमार काय बोलले आहेत ते जाणून घ्या.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर खळबळ उडाली आहे. आता अक्षय कुमारनेही या वादात उडी घेतली आहे. ही बाब इतकी वाढली आहे की आज परराष्ट्र मंत्रालयाने यावर अशा लोकांना सल्लावजा इशारा दिला आहे. अक्षय कुमार यांनी ट्वीट करुन परराष्ट्र मंत्रालयाला पाठिंबा दर्शविला आहे. अक्षय कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलंय की जे लोक प्रकरणाला बिघडवू पाहत आहे, त्यांच्यापासून दूर राहावे.

अभिनेता अक्षय कुमारने आज ट्विटरवर लिहलंय की, "शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा."

काही लोक अजेंडा चालवत आहे : परराष्ट्र मंत्रालय

शेतकरी आंदोलनाला संदर्भात परदेशात बसलेल्या काही शक्ती अजेंडा चालवत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या विषयांवर कोणतेही मत देण्यापूर्वी, संपूर्ण माहिती मिळवणे चांगले. अर्धवट माहितीवर सोशल मीडियावर व्यक्त केलेल मत हे बेजबाबदार असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालय ट्विटरवर #Indiatogether #IndiaAgainstPropoganda हॅशटॅग प्रमोट करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानंतर आज अनेक स्टार त्याचे समर्थन करत आहेत.

Farmers Protest India: शेतकरी आंदोलनाच्या बाजूने ग्लोबल सेलिब्रिटी, पॉपस्टार रिहानानंतर ग्रेटा थनबर्गकडून शेतकऱ्यांचं समर्थन

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात काय म्हटले आहे? "या विरोधाला भारताची लोकशाही नीतिमूल्ये आणि राजकारणाच्या संदर्भातून पाहिले पाहिजे. सरकार आणि संबंधित शेतकरी संघटना या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा बाबींवर भाष्य करण्यापूर्वी, आपण वस्तुस्थिती शोधून घ्यावी आणि मुद्द्यांविषयी योग्य ते समजून घ्यावे अशी आमची विनंती आहे. खळबळजनक सोशल मीडिया हॅशटॅग आणि टिप्पण्यांचे आमिष, विशेषत: सेलिब्रिटीज लोकांनी करणे योग्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहाना काय बोलली? कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे."

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget