एक्स्प्लोर

Covid In China : चीनमध्ये कोरोनाचा हाहा:कार; शांघायमध्ये पुन्हा लॉकडाऊन

Covid In China : चीनमध्ये कोरोनाचा हाहा:कार. अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक, शांघायमध्ये पुन्हा लॉकडाऊन

Covid In China : कोरोनानं संपूर्ण जगाची धास्ती वाढवली आहे. या जीवघेण्या व्हायरसचा सामना संपूर्ण जगभरातील देश गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. अशातच पुन्हा एकदा जगभरात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचं उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर, शांघाय व्यतिरिक्त चीनमधील इतर देशांमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शांघायच्या स्थानिक सरकारनं सांगितलं की, सोमवार ते शुक्रवार शांघायच्या पुडोंग आणि आसपासच्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच पीपल्स कोविडची मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जात आहे.

शांघायच्या स्थानिक प्रशासनानं सांगितलं की, "हुआंगपु नदीच्या पश्चिमेकडील डाउनटाउन भागात शुक्रवारपासून लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच लोकांना घरातच राहण्याचे आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अत्यावश्यक कार्यालयं वगळता इतर सर्व कार्यालयं बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सरकारी आदेशात म्हटलं आहे.

शांघायमध्ये पुन्हा लॉकडाऊन 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टही बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. 26 मिलियन लोकसंख्या असणाऱ्या शांघायमध्ये आता अनेक सेक्टर्स बंद करण्यात आले आहेत. जागोजागी कोरोना चाचण्या करण्यासाठी तपासणी केंद्रही सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शांघायच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न 

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. सध्या चीनच्या उत्तरेकडील जिलिनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. तसेच बीजिंगमध्ये 'डायनामिक झिरो-कोविड' नीति अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चिनी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आमचं संपूर्ण लक्ष लवकरात लवकर कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यावर आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांध्ये 10.6 टक्क्यांनी घट, गेल्या 24 तासांत 1270 नवे रुग्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Prakash Abitkar : मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Parbhani : शरद पवारांनी घेतली Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबीयांची भेट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणेNilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Prakash Abitkar : मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
Rahul Gandhi : शरद पवारांनंतर राहुल गांधीही परभणीत येणार; सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार भेट, दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
शरद पवारांनंतर राहुल गांधीही परभणीत येणार; सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार भेट, दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर
Sanjay Nahar : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजकांना धमकीचे फोन; नाव बदलण्याची मागणी अन् नंतर..., नेमकं काय घडलं?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजकांना धमकीचे फोन; नाव बदलण्याची मागणी अन् नंतर..., नेमकं काय घडलं?
मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; बीड, परभणीसह एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी,ठाकरेंना शायरीतून टोला
मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; बीड, परभणीसह एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी,ठाकरेंना शायरीतून टोला
Anjali Damania on Devendra Fadnavis : फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? अंजली दमानियांकडून थेट सवाल
फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? अंजली दमानियांकडून थेट सवाल
Embed widget