Sri lanka : आर्थिक संकटात श्रीलंकेला दिलासा, जागतिक बँकेची मिळणार मदत
Sri lanka Economic Crisis : श्रीलंकेच्या जनगणना आणि सांख्यिकी विभागाने आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दरवर्षी मार्चमध्ये वार्षिक महागाईचा दर 21.5 टक्क्यांवर आला आहे.
Sri lanka Economic Crisis : श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशात आता जागतिक बँक (World Bank) श्रीलंकेला आर्थिक मदत करणार आहे. जागतिक बँक श्रीलंकेला पुढील चार महिने औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 30 कोटी ते 60 कोटी डॉलरपर्यंतची आर्थिक मदत करणार आहे. श्रीलंकेचे अर्थ मंत्री अली साबरी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. साबरी सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच्या बैठकीसाठी वॉशिंग्टनमध्ये आहेत. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली आहेत.
दरम्यान जागतिक बँकेने श्रीलंकेला आर्थिक मदत देण्याचं मान्य केलं आहे. साबरी यांनी यावेळी सांगितले की, भारताने देखील श्रीलंकेला इंधन खरेदी करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर देण्याचं मान्य केले आहे. तसेच भारताकडून अतिरिक्त एक अब्ज डॉलर मदत मिळविण्यासाठी चर्चा सुरू आहे. भारताने यापूर्वीच श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिलं आहे.
श्रीलंकेत महागाई नियंत्रणाबाहेर
दरम्यान, श्रीलंकेत महागाईमुळे जनतेचं जगणं कठीण झालं असून अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या जनगणना आणि सांख्यिकी विभागाने आपली आकडेवारी जाहीर केली आहे. वार्षिक माहितीच्या आधारावर मार्चमध्ये महागाईचा दर 21.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशांकातील अन्नधान्यांवरील महागाई 29.5 टक्क्यांवर आली आहे. तर, खाद्येतर महागाई दर 14.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.
भारतची श्रीलंकेला सातत्यानं मदत
दुसरीकडे, भारताने गेल्या तीन महिन्यांत श्रीलंकेला सुमारे 2.5 अब्ज डॉवरची मदत दिली आहे. यामध्ये इंधन आणि अन्नासाठी कर्जाचा समावेश आहे. याशिवाय भारत श्रीलंकेला आणखी एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत देण्याच्या विचारात आहे. दुसरीकडे, चीनचे प्रवक्ते झू आणि वांग यांनी चीनकडून देण्यात आलेल्या मदतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Tina Dabi : IAS टीना दाबी झाल्या महाराष्ट्राची सून, IAS प्रदीप गवांडेंसोबत विवाहबंधनात
- Afghanistan Blast: मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट; 33 जणांचा मृत्यू
- बंदुकीचा धाक दाखवून बॉक्सर आमिर खानचे 70 लाखांचे घड्याळ लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha