(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | जगभरात कोरोनाचा हाहाकार! इटली, अमेरिकेत मृत्यूतांडव सुरूच
संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झालं आहे. इटली अमेरिकेत कोरोनाने हैदोस घातला आहे, तर चीनमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून जगभरात एकूण 7 लाख 21 हजार 412 कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत 33 हजार 956 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 51 हजार 4 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 10 हजार 779 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्पेनचा दुसरा क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये 6803 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काल स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचाही मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये शाही परिवारातील हा पहिला मृत्यू होता. अमेरिकेतही कोरोनाचा हैदोस पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2484 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 42 हजार 47 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या जगभरातील जवळपास 177 देश कोरोनाच्या सावटाखाली आहेत. जाणून घेऊयात जगभरातील देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे त्याबाबत...
जगभरात असा फोफावत गेला कोरोना व्हायरस :
जानेवारी 19 : 100 रूग्ण जानेवारी 24 : 1000 रूग्ण फेब्रुवारी 12 : 50000 रूग्ण मार्च 6 : 1 लाख रूग्ण मार्च 18 : 2 लाख रूग्ण मार्च 21 : 3 लाख रूग्ण मार्च 24 : 4 लाख रूग्ण मार्च 26 : 5 लाख रूग्ण मार्च 28 : 6 लाख रूग्ण मार्च 29 : 7 लाख रूग्ण
पाहा व्हिडीओ : जगभरात कोरोनाचा कहर सुरुच; जगात आतापर्यंत 34 हजार बळी
इटलीमध्ये कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच
इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. तसेच तेथील लॉकडाऊन संपण्याची तारिख जवळ येत चालली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 10 हजार 779 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 26676 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटल्समध्ये भरती आहेत, तर 3,856 लोकांना इन्टेन्सिव केयरमध्ये ठेवण्यात आलं आहे.
स्पेनमध्ये 24 तासांत 838 लोकांचा मृत्यू
स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 24 तासांमध्ये 838 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मृतांचा आकडा वाढला आहे. देशात सक्तीने लॉकडाऊन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशांमध्ये आतापर्यंत 6 हजार 803 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हजारांपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे.
अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2612 लोकांचा मृत्यू
अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 2400 वर पोहोचला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू न्युयॉर्क शहरात झाले आहेत. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग 142047 लोकांना झाला आहे. मेरिकेत कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिजीजचे संचालक प्रख्यात संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. एवढचं नाहीतर काही दिवसांत अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ : कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत एक ते दोन लाख मृत्यू होण्याचा अंदाज
फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत 292 लोकांचा मृत्यू
फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे गेल्या 24 तासांमध्ये 292 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून एकूण 2606 झाला आहे. सध्या जवळपास 19,000 रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तर 4632 लोक सध्या आयसीयूमध्ये आहेत. या शनिवारपासून 319 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इराणमध्ये आतापर्यंत 2640 लोकांचा मृत्यू
इराणमध्ये रविवारी कोरोना व्हायरसमुळे 123 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशातील मृतांचा आकडा वाढून 2640 झाली आहे. इराणमध्ये 38309 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत 12391 रूग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 3467 लोकांची प्रकृती गंभीर आहे.
चीनमध्ये सामान्य होत आहे परिस्थिती
चीनच्या वुहान शहरातून संपूर्ण जगबरात पसरलेला कोरोनाने अनेकांचे जीव घेतले आहेत. परंतु सध्या तेथील परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. तेथील नव्या रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर मृत्यूंचं प्रमाणही घटलं आहे.
संबंधित बातम्या :
CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईतील सैफी रुग्णालयातील कोरोनाबाधित सर्जनचे रुग्णांवर उपचार; पालिकेकडून हॉस्पिटल सील
Coronavirus | कोरोना संकट | राज्यभरात 22,118 खोल्यांमध्ये 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण
Coronavirus | आता पाच मिनिटात येणार कोरोना व्हायरसचा रिपोर्ट; अमेरिकेत संशोधन