एक्स्प्लोर

CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत काही महत्वाच्या सूचना केल्या तसेच पोलिस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

मुंबई : कोरोनाचा गुणाकार काळ आता सुरु झालाय, पहिल्या पायरीवर कोरोना थांबवला तरच अटकाव शक्य आहे. ही आणीबाणीची स्थिती, विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलं. यावेळी त्यांनी कोरोनाशी सुरु असलेल्या या युद्धात कार्यरत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना मानाचा मुजरा करत आभार व्यक्त केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या या परिस्थितीत मोठी दुर्घटना घडेल असं काही करु नका. स्थलांतर करु नका, आपण जिथं आहात तिथं थांबा, तुमची व्यवस्था करण्यात येईल. सरकारला विनाकारण कठोर पावलं उचलायला लावू नका. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करावं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवरचा ताण वाढवू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तर माझ्यासोबत आहेतच शिवाय विरोधी पक्षही मला साथ देतो आहे. राजही मला फोन करतो आहे. सूचना देतो आहे. सर्वांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि करोनाशी लढा दिला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, एक चांगली टीम तयार झाली आहे. जगभरात या विषाणूने थैमान घातलं आहे. कोणताही देश कोणत्याही देशाच्या मदतीला धावून येत नाही असं चित्र आहे. ज्यांनी काळजी घेतली नाही त्यांची काय परिस्थिती आहे ते भीषण आहे. ती दृश्यं पाहिल्यानंतर ते चित्र भयंकर आहे. इतर राज्यातल्या कामगारांनी महाराष्ट्र सोडू नये. त्यांची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार. राहण्याची सोय आणि जेवणाची सोय आम्ही करतो आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिसांचे मानले आभार यावेळी त्यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत प्रत्येकाचे आभार मानले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना मी मानाचा मुजरा करतो. ज्या डॉक्टरांशी शक्य आहे त्या सगळ्यांशी मी बोलतो आहे मला अनेकांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढेल. त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही हे मला ठाऊक नाही मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. या उर्जेला काय म्हणायचं? आरोग्य विषयक समस्येशी लढणाऱ्या या सगळ्या वीरांना माझा मानाचा मुजरा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मी पोलिसांचेही आभार मानतो आहे. कारण पोलिसांचे काम हे देखील डॉक्टरांइतकेच महत्त्वाचे आहे. आपण सक्तीने घरी बसावं यासाठी ते बाहेर काम करत आहेत. त्यांचेही मी धन्यवाद देतो. घराबाहेरची लढाई तुमचंच सरकार लढतं आहे. तुम्ही फक्त घरात राहून आम्हाला साथ द्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget