मुंबईतील सैफी रुग्णालयातील कोरोनाबाधित सर्जनचे रुग्णांवर उपचार; पालिकेकडून हॉस्पिटल सील
सैफी रुग्णालयातील कोरोनाची लागण झालेल्या सर्जनने रुग्णांवर उपचार केल्याची बाब उघड झाली. याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने हॉस्पिटल सील करण्याचे आदेश दिलेत.
मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अगोदर परदेशातून आलेले रुग्ण कोरोना बाधित होते. मात्र, आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयाबाबतही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सैफी रुग्णालयातील सर्जन जो कोरोना बाधित आढळला होता. त्याने त्याआधी रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सैफी रुग्णालयाला कठोर आदेश दिलेत.
सैफी रुग्णालयातील सर्जन आणि त्यांच्या मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याच सर्जनच्या वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करत काही आदेश रुग्णालय प्रशासनाला दिलेत. यात सैफी रुग्णालयातील सर्जन 20 मार्चपासून रुग्णालयात काम करत होते. सर्जन कोरोना बाधित असल्यामुळे त्यांनी ज्या पाच रुग्णांवर यादरम्यान उपचार केले त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात यावे. ह्या सर्जनच्या संपर्कातील हाय रिक्स आणि लो रिस्क संबंधितांची कोरोनाची टेस्ट करण्यात यावी. संपर्कात आलेल्या पाच हाय रिस्क लोकांना रुग्णवाहिकेतून नेऊन कॉरंटाईन करण्यात यावे.
आधी जन्म कोरोना चाचणी किटचा, नंतर पोटातल्या बाळाला; पुण्यातील मराठमोळ्या महिलेची किमया
मुंबई महापालिकेचा आदेश नऊ जणांना हॉस्टेलमध्ये कॉरंटाईन करण्यात आले आहे. रुग्णालयातील ओपीडी (OPD) आणि सर्जिकल आयसीयू सील करावे. संपूर्ण रुग्णालयात निर्जंतुकीकरण करण्यात यावे. पुढचे 14 दिवस रुग्णालयात ओपीडी आणि प्रवेश नसल्याची रुग्णालयात नोटीस लावावी. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. आत्ताच्या घडीला राज्यात 167 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, पाच जणांचा यात मृत्यू झालाय. यात सर्वाधिक 63 जण मुंबईत आहेत. त्याखालोखाल सांगतील 42 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
coronavirus | राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 167 वर, दिवसभरात आठ नवे रुग्ण
राज्यातील शहर आणि जिल्ह्यानुसार आकडेवारी पुणे – 19, पिंपरी-चिंचवड – 13, सांगली – 24, नागपूर – 12, कल्य़ाण-डोंबिवली – 6, नवीमुंबई – 6, ठाणे – 5, यवतमाळ – 4, अहमदनगर – 3, पनवेल – 2, सातारा – 2, उल्हासनगर – 1, वसई-विरार – 1, पालघऱ – 1, सिंधुदुर्ग – 1, औरंगाबाद – 1, रत्नागिरी – 1, कोल्हापूर – 1, गोंदिया – 1. तर, देशातील आकडा हा हजारच्या आसपास पोहचला आहे. महाराष्ट्रनंतर केरळमध्येही शंभरच्या पुढे आकडा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे.
#CoronaUpdate | चीनमध्ये कोरोना नियंत्रणात कसा आला? सिंगापूरमध्ये काय प्रयत्न सुरू?