Coronavirus | आता पाच मिनिटात येणार कोरोना व्हायरसचा रिपोर्ट; अमेरिकेत संशोधन
आता अवघ्या पाच मिनिटात कोरोना व्हायरसच्या टेस्टचा रिपोर्ट येणार आहे. अमेरिकेतील अॅबॉट लॅबोरेटरीजने या कोरोना चाचणी किटची निर्मिती केली आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगात पसरत आहे. हे टाळण्यासाठी अमेरिकन प्रयोगशाळेत एक किट विकसित करण्यात आले आहे. या किटच्या मदतीने कोरोना चाचणी अत्यंत कमी कालावधीत होणार आहे. अॅबॉट लॅबोरेटरीजने हे किट विकसित केले असून फूड अॅण्ड ड्रग्स असोसिएशन ऑफ अमेरिका (एफडीए) ने या किटला मान्यता दिली आहे. या किटचे वैशिष्ट म्हणजे हे किट अत्यंत लहान असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अतिशय सोपं आहे. प्रायोगित तत्वावर याची चाचणी घेण्यात आली आहे.
कोरोना विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचणी करुन या साखळीला तोडणे फार आवश्यक आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना चाचणी किटचा रिझल्ट यायला पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याला विलंब लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अॅबॉट लॅबोरेटरीजने संशोधन करुन एक किट विकसित केलं आहे. या किटच्या मदतीने कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी अवघ्या पाच मिनिटांत समजणार आहे. तर, निगेटिव्ह चाचणीला 13 मिनिटांचा अवधी लागणार आहे. कंपनीचे अध्यक्ष रॉबर्ट फोर्ड म्हणाले, वेगाने परिणाम दाखवणारे हे कोरोना चाचणी किट या संकटात क्रांतीकारी ठरणार आहे.
राज्यात कोरोनाचा आठवा बळी; बुलडाण्यात मृत्यू झालेला महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
अमेरिकेमध्ये चीनपेक्षा जास्त संसर्ग अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.
इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दहा हजारांवर इटलीमध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कारण शनिवारी 889 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दहा हजार पार पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या इटलीमध्ये सर्वाधिक आहे. देशामध्ये या घातक आजारामुळे एकूण 10023 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 92472 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
CM Thackeray #Corona | ही आणीबाणीची परिस्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान - मुख्यमंत्री