एक्स्प्लोर

Coronavirus | जगभरात 6 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रूग्ण; इटलीमध्ये मृतांचा आकडा 10 हजार पार

देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा लाखांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला आहे. जाणून घेऊया जगभरातील देशांची काय स्थिती आहे?

अमेरिकेमध्ये चीनपेक्षा जास्त संसर्ग

अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांता मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दहा हजारांवर

इटलीमध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कारण शनिवारी 889 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दहा हजार पार पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या इटलीमध्ये सर्वाधिक आहे. देशामध्ये या घातक आजारामुळे एकूण 10023 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 92472 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 832 लोकांचा मृत्यू

स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मागील 24 तासांत 832 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संसर्गामुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या 5982 झाली आहे. स्पेनमध्ये दररोज आठ हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत.

फ्रान्समध्ये 319 लोकांचा मृत्यू

फ्रान्समध्ये शनिवारी कोरोना व्हायरसमुळे 319 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकजा 2314 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाचा 37575 लोकांना संसर्ग झाला आहे. 17620 लोक हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19, मदत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन

इराणमध्ये संसर्ग झालेल्यांचा आकडा 35408 वर

इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून आतापर्यंत 35408 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तुर्कीमध्ये शुक्रवारपर्यंत 2517 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानमध्ये 1400 पेक्षा अधिक नवीन प्रकरणं समोर आली आहेत.

पाकिस्तानमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे. येथे 12000 अधिक कोरोना संशयित आहेत. तर 1400 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पंजाब प्रांतात 490, सिंध येथे 457, खैबर पख्तूनख्वामध्ये 180, तर बलूचिस्तान येथे 133, गिलगित-बाल्टीस्तान 107, इस्लामाबाद 39 आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू

ब्रिटनमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 260 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या 1000 वर पोहोचला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा वाढला असून 17089 वर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या :

Coronavirus | कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा हैदराबाद युनिव्हर्सिटीचा दावा

IndiaFightsCorona | कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले, मदतीचा ओघ सुरु

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार

लढा! कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget