(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार
कोरोना व्हायरसमुळे देश मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मदतीसाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे.
मुंबई : लॉक डाऊनच्या काळात मदतीचं मोठं जाळं उभं करण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने लॉक डाऊनमुळे बाधित गोर गरीब, मजूर, ज्येष्ठ नागरिक, गरजूंना अन्न-धान्याचा पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाने दिवसाला 51 लाखांचा टार्गेट दिला आहे. मात्र, दिवसाला किमान 20 ते 22 लाख लोकांपर्यंत मदत पोहचण्याचा राज्यातील नेत्यांचा निर्धार आहे. आगामी काळात या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी भाजप तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.
यासाठी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि पियुष गोयल यांनी राज्यातील नेते आणि आमदार-खासदारांशी ऑडिओ ब्रिजच्या (संवाद सेतूच्या) माध्यमातून संवाद साधला. तसेच आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून 'भोजन सहाय्यता संकल्पची' रणनीती आखली.
लढा! कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर
असा असेल भाजपचा मास्टर प्लॅन
- निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने केंद्रीय नेतृत्वापासून ते अगदी बूथ स्थरापर्यंत उभारलेलं जाळं या कामासाठी वापरण्यात येणार आहे.
- या उपाययोजना राबवण्यासाठी राज्यात समन्वयाची जबाबदारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश सचिव संजय उपाध्याय यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
- देशभरातील 1 कोटी कार्यकर्ते 5 कोटी गरीब गरजूंच्या भोजनाची व्यावस्था करतील. यासाठी प्रत्येक कार्यकर्ता किमान 5 जणांची जबाबदारी घेईल.
- राज्यात 51 लाखांचं टार्गेट देण्यात आले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरी अन्न शिजवून वितरण करावे,
- व्यावसायिक भोजनालयांची मदत घ्यावी किंवा धान्य, डाळी, मीठ, मसाल्याची पाकिटं पुरवावीत.
- फक्त मुंबईतच 10 लाख गरजू लोकांना भोजन पुरवण्याचा प्रयत्न असणार आहे.
अशी असेल कार्य योजना
- सर्व खासदार आमदारांच्या घरून एक कार्यकर्ता कंट्रोल रूम चालवली जाईल ज्याचा नंबर त्या परिसरात कळवळा जाईल.
- राज्यातील 700 मंडलचे व्हाट्सएप ग्रुप तयार केले जातील. भोजन पुरवण्याची माहिती या ग्रुपद्वारे मंडल अध्यक्षांना दिली जाईल.
- जिल्हाध्यक्षांनी लोकप्रतिनिधी आणि मंडल अध्यक्षांच्या मध्ये दुवा म्हणून काम करायचे आहे.
- प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि महानगरात विधानसभा स्तरावर हेल्पलाईन सुरू केली जाईल.
- दारिद्र्य रेषेखालील लोकांना ज्यादा रेशन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी प्रत्येक मंडल मध्ये एक कार्यकर्ता
- स्वतंत्रपणे अन्न नागरी पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार यांच्या संपर्कात राहून गरजूंपर्यंत शिधा पोचतोय याची खबरदारी घेणार.
- भाजपचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सभागृह नेते दररोज सर्व उपक्रमाची माहिती, सूचना, अहवाल बावनकुळे यांना पाठवणार. या कामाची दररोज समीक्षा केली जाणार.