चीन बनवत आहे स्वतःचे स्पेस स्टेशन, तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवलं
China Building Space Station: चीन स्वतःचे स्पेस स्टेशन बनवत आहे, ज्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी चीनने रविवारी तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे.
China Building Space Station: चीन स्वतःचे स्पेस स्टेशन बनवत आहे, ज्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी चीनने रविवारी तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे. येथे ते काम करतील आणि सहा महिने राहतील, कारण स्पेस स्टेशनचे काम आता पुढील टप्प्यावर पोहोचले आहे.
Shenzhou-14 spacecraft घेऊन जाणारे लाँग मार्च-2 एफ रॉकेट रविवारी चीनमधील गान्सू प्रांतातील जिउक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटर येथून स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:44 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. Shenzhou ला चिनी भाषेत दैवी पात्र म्हणतात.
या मोहिमेचे कमांडर चेन डोंग आहे. त्यांच्यासोबत लिऊ यांग (Liu Yang) आणि कै झुझे (Cai Xuzhe) हे देखील आहेत. हे तिघे सहा महिने तिआन्हे (Tianhe) येथे घालवतील. चेन हे 2016 मध्ये शेनझोऊ येथे 11 मोहिमेवर गेले होते. हे त्यांचे दुसरे स्पेस मिशन आहे. 43 वर्षीय लिऊ 2012 मध्ये शेनझोऊ 9 मध्ये अंतराळात जाणाऱ्या पहिल्या चीनी महिला ठरल्या, ही त्यांची दुसरी मोहीम आहे. तर 46 वर्षीय Cai पहिल्यांदाच अंतराळात जात आहे.
2021 मध्ये स्पेस स्टेशन बांधणीला सुरुवात झाली
Shenzhou-14 हे चार क्रू मिशनपैकी तिसरे आणि एकूण 11 मोहिमांपैकी सातवे आहे. त्यांच्या मदतीने या वर्षअखेरीस स्पेस स्टेशनचे काम पूर्ण होईल. चीनने एप्रिल 2021 मध्ये तियान्हेच्या प्रक्षेपणासह तीन-मॉड्यूल स्पेस स्टेशनचे बांधकाम सुरू केले. तिआन्हेचा आकार एका बसपेक्षा थोडे मोठे आहे. याची लांबी 16.6 मीटर आहे. टी-आकाराचे स्पेस स्टेशन पूर्ण झाल्यानंतर, तिआन्हे अंतराळवीरांसाठी क्वार्टर बांधली जातील. Shenzhou-14 नंतर उर्वरित दोन मॉड्यूल, प्रयोगशाळा केबिन्स वेंटियन, मेंगटियन जुलै आणि ऑक्टोबरमध्ये लॉन्च केले जातील. चीनचे हे स्पेस स्टेशन दशकभर टिकेल अशा पद्धतीने डिझाइन केले आहे. याचे वजन 180 टन असेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
भारत-अमेरिका व्यापार नवीन उंचीवर; चीनला मागे टाकत अमेरिका भारताचा नंबर एकचा व्यापारी भागीदार
Corona Effect In China : चीनवरही आर्थिक मंदीचं सावट, शांघायमधील लॉकडाऊन उठल्यानंतर अडचणीत वाढ