Corona Effect In China : चीनवरही आर्थिक मंदीचं सावट, शांघायमधील लॉकडाऊन उठल्यानंतर अडचणीत वाढ
Corona Effect In China : लॉकडाउनमधून बाहेर पडल्यानंतर चीनचं जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या शांघाय शहरापुढे आर्थिक मंदीचं सावट उभं राहिलं आहे. शांघाय शहरात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
Corona Effect In China : कोरोना महामारीमुळे जगभरात खळबळ माजली होती. यामुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. सगळीकडे आर्थिक मंदीचं वातावरण पाहायला मिळत होतं. अगदी छोट्या देशांपासून मोठे देशही आर्थिक संकटात सापडले होते. कोरोनाचा चीनवरही मोठा परिणाम झाला आहे. चीनचं मोठं आर्थिक केंद्रबिंदू असणाऱ्या शांघाय शहरावर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला आहे. चीनची आर्थिक राजधानी मानलं जाणारं शांघाय शहराच आर्थिक संकट दिवसेंदिवस दाट होतं आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे.
कोरोनाच्या संसर्गात घट झाल्याने 01 जूनपासून शांघायमधील लॉकडाउन उठवण्यात येणार आहे. शांघायमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, 06 जूनपासून शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच दुकानं आणि मॉल्सची सुरु होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर आर्थिक परिस्थिकती सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीजिंगचे अधिकारी प्रिमियर ली केकियांग यांनी बुधवारी जगातील दुसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेबाबत गंभीर बाब सांगितली आहे. त्यांनी सांगितले आहे की, 2020 वर्षाच्या तुलनेनं या वर्षी आर्थिक परिणामांमुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, एप्रिल आणि जूनमध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. यावेळी तिमाहीत 4.8 टक्क्यांनी वाढ होईल.
देशांतर्गत हवाई वाहतुकीवरही परिणाम
कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाल्याने देशांतर्गत हवाई वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलं आहे की, 21 मे ते 20 जुलै या कालावधीत चीनी विमान कंपन्यांना सबसिडी देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली मंदी आणि तेलाच्या चढ्या किमतींचा सामना करण्यासाठी विमान कंपन्यांना मदत होईल. लॉकडाऊनमुळे शांघाय आणि आसपासच्या परिसरात देशांतर्गत हवाई वाहतूक कमी झाली आहे.
शांघायस्थित चायना इस्टर्नने माहिती दिली आहे की, एप्रिल 2021 मध्ये प्रवाशांची संख्या 90.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. चीनच्या विमान वाहतूक नियामक मंडळाने गुरुवारी सांगितले की, एप्रिलमध्ये एकूण हवाई प्रवासी वाहतूक दर वर्षाच्या तुलनेत सुमारे 85 टक्क्यांनी कमी झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Monkeypox RTPCR Kit : मंकीपॉक्स तपासणीसाठी भारतीय कंपनीचं RT-PCR किट, एका तासात मिळणार रिपोर्ट
- Monkey Pox Cases : 'मंकीपॉक्स'नं जगाची धाकधूक वाढवली, अमेरिकेतही शिरकाव, 9 रुग्णांची नोंद; इतर देशांची काय परिस्थिती?
- Monkeypox : कोरोनानंतर आता नव्या ‘मंकीपॉक्स’ विषाणूचा शिरकाव, काय आहेत ‘या’ विषाणूची लक्षणे? जाणून घ्या...