एक्स्प्लोर
Advertisement
चीन पाकच्या प्रेमात अंधळा, UN मध्ये मसूद अझहरचा बचाव
नवी दिल्ली: संपूर्ण जगाची डोकेदुखी बनलेल्या मसूद अझहरचा बचाव करण्यासाठी चीनने कंबर कसली आहे. संयुक्त राष्ट्रात चीनने पुन्हा वीटोचा वापर करुन त्याचा बचाव केला आहे. जर चीनने वीटोचा वापर केला नसता, तर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला हिरवा कंदिल मिळाला असता.
काल वीटोची कालमर्यादा समाप्त होणार होती, मात्र त्याच दरम्यान चीनने मसूदला वाचवण्यासाठी पुन्हा वीटोचा वापर केला. त्यामुळे मसूदला पुन्हा सहा महिन्यांचे मोकळे रान मिळाले आहे. तसेच तो आता पाकिस्तानात बसून पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु करेल.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या एका कमेटीसमोर भारतने मसूदला दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली आहे, या मागणीला 14 देशांनी मान्यता दिली आहे. मात्र, भारताच्या या प्रयत्नात खोडा घालण्यासाठीच चीनने वीटोचा वापर करुन मसूदला वाचवले आहे. जर भारताची मागणी मान्य केली गेली असती, तर मसूदच्या जगातील सर्व संपत्तीवर टाच आली असती. तसेच त्याला कुठेही मुक्त संचार करण्याची संधी मिळाली नसती.
पण पाकिस्तानच्या अंधळ्या प्रेमात असलेल्या चीनने वीटोचा वापर करुन मसूदचा बचाव केल्याने भारताच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे.
अजहर मसूद कोण आहे?
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अझहर मसूदने काही दिवसांपूर्वीच पठाणकोटमधील भारताच्या हवाईदलावर दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. तसेच नुकत्याच झालेल्या उरीमधील हल्ल्यामध्येही त्याचा हात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यापूर्वीही त्याने संसदेवरही हल्ला घडवून आणला होता. तसेच 1999 मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणात दहशतवाद्यांनी मसूदच्या सुटकेची मागणी केली होती. नईलाजाने तत्कालिन सरकारला ती मान्य करुन त्याची सुटका करावी लागली. पण आता हाच मसूद केवळ भारतच नव्हे, तर साऱ्या जगाची डोकेदुखी बनला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement