Coronavirus | प्रिन्स चार्ल्सनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनाही कोरोनाची लागण
दोन दिवसांपूर्वीच ब्रिटन राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. आता पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांचेही कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
लंडन : कोरना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. सर्वसामान्यांसह प्रसिद्द व्यक्तीही कोरोनाच्या शिकार झाल्या आहेत. ब्रिटनमध्ये तर राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही घटना ताजी असताना आता ब्रिटनवासीयांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या आजाराची गंभीरता आणखीनच वाढली आहे. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत कळवले.
Over the last 24 hours I have developed mild symptoms and tested positive for coronavirus.
I am now self-isolating, but I will continue to lead the government’s response via video-conference as we fight this virus. Together we will beat this. #StayHomeSaveLives pic.twitter.com/9Te6aFP0Ri — Boris Johnson #StayHomeSaveLives (@BorisJohnson) March 27, 2020
यापूर्वी कोरोनाच्या महामारीचा फटका ब्रिटन राजघराण्याला देखील बसला आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रिन्स चार्ल्स यांचे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. ते आधीपासूनच स्कॉटलंडमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. तर त्यांची पत्नी कॅमिला यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी चार्ल्स यांनी मोनकोचे प्रिंस एल्बर्ट यांची भेट घेतली होती. प्रिन्स एलबर्ट हे देखील आधीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. तर, आता पंतप्रधान बोरिस यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
Coronavirus | ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण
क्लेरेंस हाऊसच्या सूत्रांनी सांगितलं की, प्रिन्स ऑफ वेल्स यांचे कोराना व्हायरसचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना लागण झाली असली तर त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते मागील काही दिवसांपासून सगळं काम घरूनच करत आहेत. दरम्यान, ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी देशात COVID-19 वर अटकाव घालण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे. बोरिस यांनी म्हटलं आहे की, कुठल्याही पंतप्रधानाला आपल्या देशात अशी बंधनं घालणं आवडत नाही पण सध्याची स्थिती गंभीर आहे. कोरोनावर अटकाव घालण्यासाठी आपल्याला ही पावलं उचलावी लागत आहेत, असं ते म्हणाले.
Sri Sri Ravi Shankar | कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी श्री श्री रविशंकर यांचं मार्गदर्शन | विशेष मुलाखत