एक्स्प्लोर
Coronavirus | ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण
प्रिन्स ऑफ वेल्स यांचे कोराना व्हायरसचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना लागण झाली असली तर त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते मागील काही दिवसांपासून सगळं काम घरूनच करत आहेत.
![Coronavirus | ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण coronavirus prince charles tests positive for covid 19 Coronavirus | ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/25230242/prins.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ब्रिटन : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाच्या या महामारीचा फटका आता ब्रिटनच्या राजघराण्याला देखील बसला आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रिन्स चार्ल्स यांचे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. ते आधीपासूनच स्कॉटलंडमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. तर त्यांची पत्नी कॅमिला यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी चार्ल्स यांनी मोनकोचे प्रिंस एल्बर्ट यांची भेट घेतली होती. प्रिन्स एलबर्ट हे देखील आधीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 422 लोकांचा मृत्यु झाला आहे. तर 8,077 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
क्लेरेंस हाऊसच्या सूत्रांनी सांगितलं की, प्रिन्स ऑफ वेल्स यांचे कोराना व्हायरसचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना लागण झाली असली तर त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते मागील काही दिवसांपासून सगळं काम घरूनच करत आहेत.
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी देशात COVID-19 वर अटकाव घालण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे. बोरिस यांनी म्हटलं आहे की, कुठल्याही पंतप्रधानाला आपल्या देशात अशी बंधनं घालणं आवडत नाही पण सध्याची स्थिती गंभीर आहे. कोरोनावर अटकाव घालण्यासाठी आपल्याला ही पावलं उचलावी लागत आहेत, असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)