ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात 26/11 सारखा दहशदवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
व्हिएन्नामध्ये मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
व्हिएन्ना : युरोपीयन देश ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला झाला असून दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका अतिरेक्याला ठार केलं आहे. परंतु, या अतिरेक्याच्याच शरीराला बॉम्ब लावल्याण्यात आला होता.
व्हिएन्नामध्ये मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून त्याच्या शरीरावर बॉम्ब बांधण्यात आला होता. दहशतवाद्याच्या शरीरावर बांधण्यात आलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलिसांचं एक पथक पाचारण करण्यात आलं होतं. या पथकाला दहशतवाद्याच्या शरीरावर बांधण्यात आलेला बॉम्ब निकामी करण्यात यश आलं आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी काही लोकांना वेठीसही धरलं होतं.
We are closely monitoring a terrorist attack in Vienna, Austria involving multiple assailants. There is no known nexus to New York City at this time. All #NYPD Counterterrorism Officers have been briefed and deployed accordingly. pic.twitter.com/ARDE1k08Mx
— NYPDCounterterrorism (@NYPDCT) November 2, 2020
साधरणतः शांत असणारं ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहरात सोमवारी मात्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. काही दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत संपूर्ण शहर वेठीस धरलं होतं. शहरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
दहशतवादी हल्ल्याची घटना सेंट्रल स्वीडन प्लाट्ज स्क्वॉयरवर झाली. येथे एक धार्मिक स्थळही आहे. ऑस्ट्रीयातील गृहमंत्रालयाच्या टीमने हा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितलं आहे. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच येथेही एकाच वेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करत दहशतवाद्यांनी संपूर्ण शहर वेठीस धरलं. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- तुर्की, ग्रीसमध्ये भूकंपाने हाहाकार; 22 ठार तर 700 हून अधिक जखमी
- फ्रान्समध्ये चर्चच्या बाहेर तीन लोकांची चाकूने हत्या, दहशतवादी हल्ल्याचा अंदाज
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीमुळे जवळपास 30,000 जणांना कोरोनाची लागण, 700 जणांचा मृत्यू : रिसर्च
- WHO चे प्रमुख सेल्फ क्वॉरन्टाईन, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने निर्णय