फ्रान्समध्ये चर्चच्या बाहेर तीन लोकांची चाकूने हत्या, दहशतवादी हल्ल्याचा अंदाज
हल्लेखोराने 'अल्ला हू अकबर' चा नारा देत महिलेचा गळा चिरला आणि इतर दोघांना ठार केले.16 ऑक्टोबरला अशाच प्रकारच्या हल्ल्यात एका शिक्षकाचा गळा कापण्यात आला होता त्याच्याशी या हल्ल्याचा काही संबंध आहे का अजून समजले नाही.
पॅरिस: फ्रान्सच्या नीस शहरात एका चर्चच्या बाहेर झालेल्या हल्लेखोराने केलेल्या एका हल्ल्यात तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हल्लेखोराने चाकूचा वापर केला आहे. नीसच्या महापौरांच्या मते हा दहशतवादी हल्ला आहे. हल्लेखोराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. 16 ऑक्टोबरला अशाच प्रकारच्या हल्ल्यात एका शिक्षकाचा गळा कापण्यात आला होता.
हातात चाकू घेतलेल्या हल्लेखोराने 'अल्ला हू अकबरचा' नारा देत नीस शहरातील चर्चसमोरच्या एका महिलेचा गळा कापला आणि इतर दोन व्यक्तींनाही ठार मारले. पोलीसांनी आणि नीस शहराच्या महापौरानी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितलंय. या हल्ल्यामागचा हल्लेखोराचा उद्देश काय होता ते अजून स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांनी सांगितले की हल्लेखोर हा 'अल्ला हू अकबरचा' नारा देत होता. पोलीसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळ्या चालवल्या. त्यात तो हल्लेखोर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
नीसचे महापौर एस्ट्रोसी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आणि ते म्हणाले की, "आता खूप झाले, फ्रान्समधून इस्लामच्या अशा फॅसिस्ट वृत्तीला बाहेर काढण्यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे." तसेच 16 ऑक्टोबरला चेचंन वंशाच्य़ा एका विद्यार्थ्याने पॅरिसच्या पॅरिसच्या फ्रेंच मिडल स्कुलमधील शिक्षकाचा गळा कापला होता याचीही आठवण त्यांनी करुन दिली.
यावेळी पोलीसांनी तीन लोकांच्या मृत्यूची खात्री केली आहे आणि अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले आहे. फ्रान्सचा दहशतवादी विरोधी पथक या हल्ल्याचा अधिक तपास करत आहे. या हल्ल्यानंतर फ्रान्सच्या सरकारने एक तातडीची बैठक बोलवली आहे.शार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रावरुन वाद पॅरिसच्या फ्रेंच मिडल स्कुलमध्ये एक पाठ शिकवताना फ्रान्समधील शिक्षकाने शार्ली हेब्दो वृत्तपत्राने मोहंमद पैगंबराचे प्रकाशित केलेले व्यंगचित्र दाखवले होते. त्याचा सूड म्हणून एका चेचंन वंशाच्या मुस्लिम विद्यार्थ्याने त्या शिक्षकाचा गळा चिरुन त्याची हत्या केली होती. पैगंबरांचे चित्र दाखवणे इस्लाम मध्ये निषेध मानले जाते. या घटनेवरुन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी टीका केली होती आणि फ्रान्समधील मुस्लिम मुख्य प्रवाहापासून बाजूला पडत असल्याचे सांगितले होते. यावर फ्रान्समध्ये इस्लाम विरोधी अजेंडा राबवत असल्याचा आरोप अनेक मुस्लिम राष्ट्रानी केला होता.
गुरुवारच्या ताज्या हल्ल्याचा या घटनेशी काही संबंध आहे का याची माहिती अजून समोर आली नाही.