एक्स्प्लोर

Women empowerment : पीडित महिलांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा: जिल्हाधिकारी

अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कार्यरत शासकीय करुणा महिला वस्तिगृह संस्था, शासकीय महिला भिक्षेकरी स्विकार केंद्र, येथे भेट देऊन प्रवेशितांना मिळणाऱ्या सुविधेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

नागपूर : पीडित महिलांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्यात आत्मविशवास निर्माण करा. त्यांचे मानसिक परिवर्तन घडवून आणा. समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तरच महिला यशस्वी होतील. समाज बदलण्याची सुरुवात कुटुंबातूनच व्हावी, असे आस्थापूर्वक अभिवचन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले.

महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर या योजनेंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व भारतीय स्त्री शक्ती यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हयातील संरक्षण अधिकारी व समुपदेशक यांच्यासाठी कार्यशाळा वन स्टॉप सेंटर, शासकीय करुणा महिला वसतिगृह परिसर, पाटणकर चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी  त्या बोलत होत्या.  मा. आर विमला, जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील महिला प्रवेशितांनी त्यांच्या कला कौशल्याने तयार केलेली पेंटींग व इतर वस्तुंची पाहणी करून प्रवेशितांशी संवाद साधतांना  त्यांनी लघुउद्योग निर्माण करुन प्रवेशीतांना प्रोत्साहन देऊन आर्थिक सक्षम करावं, अशा जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या.

या कार्यशाळेत संरक्षण अधिकारी व समुपदेशक यांच्या ज्ञानाची उजळणी व्हावी व त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी जेणे करून पिडित महिलांना प्रभाविपणे सक्षम करु शकतील यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  आहे. कार्यशाळेत वन स्टॉप सेंटर या योजनेंतर्गत पिडित महिलांना जास्तित जास्त सहकार्य करुन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. "कोटुंबिक हिंसाचाराचे महिलेच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम आणि समाजकार्य हस्तक्षेप व समुपदेशकाची भूमिका" याबाबत प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षिका अनघा राजे  यांनी सांगून  विस्तृत मार्गदर्शन केले.

या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

"महिलांशी निगटीत कायदे व सद्यस्थितीतील न्यायालयीन निर्णयाची माहिती" अॅड. स्मिता देशपांडे यांनी दिली. "समुपदेशनाचे कौशल्य व तंत्र" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. अपर्णा कोल्हे यांनी केले तर आभार संरक्षण अधिकारी, मंजुषा रहाणे यांनी मानले. या कार्यशाळेत महिला व बाल विकास विभागिय उपायुक्त तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अपर्णा कोल्हे,  भारतीय स्त्री शक्ती, नागपूरच्या प्रांताध्यक्ष हर्षदा पुरेकर,  भारतीय स्त्री शक्तीच्या अध्यक्षा निलम पर्वते,  मा. अनघा राजे, अॅड. स्मिता देशपांडे, डॉ. स्वाती धर्माधिकारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, संरक्षण अधिकारी, मंजुषा रहाणे, केंद्र प्रशासक अनघा मोघे, तसेच सर्व शासकीय संस्थेचे अधिक्षक व कर्मचारी वर्ग, तसेच सखी वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी वर्ग व जिल्हयातील सर्व संरक्षण अधिकारी व समुपदेशक उपस्थित होते.
          
महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कार्यरत असलेली शासकीय करुणा महिला वस्तिगृह संस्था शासकीय महिला भिक्षेकरी स्विकार केंद्र, या संस्थेला भेट देऊन प्रवेशितांना मिळणाऱ्या सोईसुविधाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. त्याबरोबरच शासकीय मुलांचे निरिक्षण गृह सुरक्षा ठिकाण, नागपूर या संस्थेला भेट देऊन तेथील प्रवेशितांशी संवाद साधून त्यांना उत्तम शिक्षण घेऊन त्यांना भावी नागरीक बनविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्यात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
Social Media Report Card : युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा दावाSanjay Shirsat on Sanjay Raut : शिरसाट स्वतः नाच्या, संजय राऊतांवर शिरसाटांची टीकाPM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची परभणी आणि नांदेडमध्ये सभाNarendra Modi Nanded Sabha : प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची नांदेडमध्ये सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
Social Media Report Card : युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
Uddhav Thackeray : फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव  ठाकरेंचा दावा
फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव ठाकरेंचा दावा
Loksabha Election 2024 : '400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्या दिग्गज नेत्याचे पीएम मोदींना पत्र; व्यक्त केली जाहीर नाराजी
'400 पारचा संकल्प अवघड', भाजपच्याच दिग्गज नेत्याचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र!
CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
Summer Fashion : उन्हाळ्यात राहायचंय कूल अन् स्टायलिश! आऊटफिट्स निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स फॉलो करा
Summer Fashion : उन्हाळ्यात राहायचंय कूल अन् स्टायलिश! आऊटफिट्स निवडण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, टिप्स फॉलो करा
Embed widget