एक्स्प्लोर
...तर पीक विमा भरण्याची मुदत वाढवून मिळणार
पीक विमा भरण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी पीक विमा भरण्याच्या हक्कापासून वंचित राहू शकतात, अशी भीती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी व्यक्त केली. मात्र, मुदतीपर्यंत पीक विमा भरता न आल्यास त्यांचा पीक विमा भरण्याची काळजी घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना आश्वासन दिलं.
मुंबई : पीक विमा भरण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी पीक विमा भरण्याच्या हक्कापासून वंचित राहू शकतात, अशी भीती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी व्यक्त केली. मात्र, मुदतीपर्यंत पीक विमा भरता न आल्यास त्यांचा पीक विमा भरण्याची काळजी घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना आश्वासन दिलं.
खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. मात्र ऑनलाईन पीक विमा भरण्यात प्रचंड विलंब आणि अडचणी येत असल्याने पीक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली.
राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका पीक विमा भरुन घेण्यास टाळाटाळ करत असून सरकारने नियुक्त केलेल्या केंद्राद्वारे ऑनलाईन पीक विमा भरण्यास प्रचंड विलंब आणि तांत्रिक अडचणी येत असल्याने पीक विमा भरण्याच्या हक्कापासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असल्याच्या बाबीकडे धनंजय मुंडेंनी आज विधानपरिषदेत सरकारचे लक्ष वेधला.
धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत, एकही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहणार नाही, ऑफलाईन पीक विमा स्वीकारण्याबाबत केंद्राला विनंती केल्याची माहिती दिली.
31 जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा. त्यानंतरही त्यांना पीक विमा भरता आला नाही, तर त्यांचाही पीक विमा भरुन घेण्याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
संबंधित बातम्या :
पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभा असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
'15 पानी ऑनलाईन फॉर्म भरायला गावात इंटरनेट तरी आहे का?''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement