Walmik Karad Beed: पोलीस ठाण्यासमोरच लावलेल्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो झळकले; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे परळीत उल्लंघन
Walmik Karad Beed: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याचा फोटो ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा बॅनरवर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले आहे.

Walmik Karad Beed बीड: बीड जिल्ह्यात (Beed) लावण्यात येणाऱ्या बॅनरवर अनधिकृ मजकूर, गुन्हेगारांचे फोटो छापण्याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी केले होते. हा आदेश 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन परळीत केल्याचे दिसून आले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा फोटो ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा बॅनरवर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले आहे. या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा देखील फोटो दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे बॅनर शहर व संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागातच लावण्यात आले असून येथूनच हाकेच्या अंतरावर नगरपरिषद देखील आहे.
जिल्हाधिकारी प्रशासन कारवाई करणार?
आता यावर जिल्हाधिकारी प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. बॅनरवर शुभेच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस युवक नेते असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बॅनर लावण्यापूर्वी मजकूर फोटोची पडताळणी करणं आता आवश्यक असल्याचे तसेच याचबरोबर अनाधिकृत फलकांवर तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेशात म्हटले होते.























