Car Care Tips: कारमध्ये एसी कधी सुरू करावा? गाडी सुरू केल्यानंतर लगेच की गाडी काही वेळ चालवल्यानंतर? पाहा...
Car AC Timing: उन्हाळ्यात एसीशिवाय कारने प्रवास करणं अवघड आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? की, तुम्ही जेव्हा गाडी सुरू करता तेव्हा एसी चालू करण्याची एक ठराविक वेळ असते.
Car Care Tips: उन्हाळ्यात कुठेच एसीशिवाय प्रवास करता येत नाही. ज्याप्रमाणे लोक घरात ठराविक वेळेसाठी एसी लावून बसतात, त्याचप्रमाणे कारमध्ये देखील एसी वापरण्याची वेगळी पद्धत असते. ज्या लोकांना उष्णतेचा जास्त त्रास होतो, ते लोक अगोदर गाडी सुरू करतात आणि काही वेळी एसी चालू ठेवतात आणि मग थंड गाडीत बसायला जातात. अनेकजण गाडी सुरू करण्यावेळीच एसी सुद्धा सुरू करतात आणि लगेच गाडी चालवतात. तर, काही लोक असे आहेत जे गाडी सुरू केल्यानंतर काही वेळ एसीशिवाय गाडी चालवतात आणि थोड्या वेळानंतर एसी सुरू करतात.
अशा परिस्थितीत, या सर्वातील उत्तम मार्ग कोणता? असा प्रश्न पडतो. कारची देखभाल आणि मायलेजच्या दृष्टीने एसी सुरू करण्याची ठराविक आहे. तर आता जाणून घेऊया की, कारमध्ये एसी नक्की केव्हा सुरू करावा? आणि कारमध्ये एसी सुरू करण्याची योग्य पद्धत काय आहे?
कारमध्ये एसी चालवण्याचे हे नियम आहेत
जेव्हाही तुम्ही कारमध्ये एसी सुरू कराल, तेव्हा नेहमी आधी इंजिन सुरू करा आणि नंतर एसी सुरू करा. यासाठी प्रथम इंजिनला व्यवस्थित वॉर्म अप होऊ द्या/गरम होऊ द्या. त्याचप्रमाणे, गाडी बंद करताना आधी थेट इंजिन बंद करू नये. कार बंद करण्यापूर्वी प्रथम एसी बंद करा आणि एसी बंद झाल्यावर इंजिन बंद केले पाहिजे. तुमची कार बराच वेळ उन्हात उभी असेल तर गाडीत बसल्याबरोबर एसी सुरू करू नये. या स्थितीत प्रथम गाडीचा दरवाजा उघडावा किंवा किमान काही वेळ खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
यानंतर एसी सुरू करावा आणि लक्षात ठेवा की, सुरुवातीला कधीही एसी सर्वात वेगवान स्केलवर चालवू नका. एसीचे तापमान किंवा वेग हळूहळू वाढवत राहा. जास्त वेगाने एसी चालवणे कारचे इंजिन आणि मायलेज दोन्हीसाठी चांगले नाही. तुमच्या कारमध्ये एसी असेल तर अनेकदा एसी सुरू ठेवूनच गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. यासोबतच गाडीच्या एसीमध्ये गॅस वगैरे टाकल्यावर त्यासोबत गाडीच्या इंजिन ऑइलचीही काळजी घेणं आवश्यक आहे.
गाडीत एसी सुरू केल्यावर गाडीत दुर्गंधी येत असेल तर ते बाष्पीभवनात जमा झालेल्या बुरशी किंवा बॅक्टेरियामुळे होते, त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्या. याशिवाय, जर कधी कारमध्ये एसी काम करत नसेल तर मेकॅनिकला दाखवण्यापूर्वी एसीचा फ्यूज तपासा, कारण अनेक वेळा एसी यामुळे चालत नाही. याशिवाय एसीमध्ये बाष्पीभवन, फिल्टरमुळे जास्त त्रास होतो, त्यामुळे मेकॅनिककडे जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.
हेही वाचा: