Vegetable Seller Won Lottery: गरीब भाजीविक्रेता 11 कोटींची लॉटरी जिंकला; तिकीट खरेदी करायला उधारीने पैसे घेतलेल्या मित्राला देणार 1 कोटी
Vegetable Seller Won Lottery: राजस्थानमधील अमित सेहराने पंजाब लॉटरी निकाल दिवाळी बंपर पारितोषिक २०२५ मध्ये ११ कोटी रुपये जिंकले आहेत.

जयपूर : ते म्हणतात ना.. नशिब कधी, कुठे आणि कसे पालटेल ते सांगता येत नाही! राजस्थानातील एका साध्या भाजीविक्रेत्यासोबत (Vegetable Seller Won Lottery) हेच घडलं आहे. पंजाब राज्य लॉटरी–दिवाळी बंपर २०२५ मध्ये राजस्थानच्या कोटपुतळी येथील अमित सेहरा या भाजीविक्रेत्याने तब्बल ११ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. (Vegetable Seller Won Lottery)
सेहरा यांनी आपल्या एका मित्राकडून पैसे उधार घेऊन पंजाबमधील बठिंडा येथील दुकानातून लॉटरी तिकीट (Vegetable Seller Won Lottery)विकत घेतले होते आणि हेच तिकीट त्यांच्या नशिबाला पालटणारं ठरलं आहे. लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि ११ कोटी रूपये जिंकल्यानंतर आनंदाश्रूंनी डोळे भरून आलेल्या अमित यांनी सांगितले, “माझ्याकडे तर चंदीगडला जाऊन बक्षीस घेण्याच्याही पुरेसे पैसे नव्हते. पण देवाने मला छप्परफाड बक्षीस दिलं आहे.”(Vegetable Seller Won Lottery)
Vegetable Seller Won Lottery: ठेल्यावर भाजी विकणाऱ्या अमित यांचे दिवस पालटले
जयपूर जिल्ह्यातील कोटपुतली येथे ठेल्यावर भाजी विकून उदरनिर्वाह करणारे अमित म्हणाले, “हा देवाचा आशीर्वाद आहे. हे पैसे मी माझ्या दोन छोट्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे.” अमित यांनी सांगितले की, ज्यांच्या कडून त्यांनी लॉटरी तिकीट घेण्यासाठी पैसे उधार घेतले होते, त्या त्यांच्या मित्रा मुकेशला ते एक कोटी रुपये देणार आहेत, “कारण त्यानेच मला या संधीपर्यंत पोहोचवले.”
Vegetable Seller Won Lottery: पत्नीसाठीही घेतलं होतं तिकीट
अमित यांनी दोन लॉटरी तिकीटं घेतली होती, एक स्वतःसाठी आणि एक आपल्या पत्नीसाठी. त्यांच्या पत्नीच्या तिकिटाला १,००० रुपये मिळाले, तर अमित यांच्या तिकिटाने ११ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला. अमित सेहरा म्हणाले, “या पैशातून मी माझ्या कुटुंबासाठी घर बांधणार आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणार.” पंजाब राज्य लॉटरीचा निकाल ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला.
























