(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : 'आगये मेरी मौत का तमाशा देखने...' दिव्यांग विद्यार्थ्याकडून अभिनेते नाना पाटेकरांची जबरदस्त मिमिक्री, 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video : एका दिव्यांग विद्यार्थ्यानं अभिनेता नाना पाटेकर यांनी भन्नाट मिमिक्री केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
Nana Patekar Mimicry Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. कधी कधी अशा व्हायरल व्हिडीओंमुळे (Viral Video) काही जण क्षणात प्रसिद्धीझोतात येतात. फक्त एखाद्या व्हायरल व्हिडीओ किंवा फोटोंमुळे अनेकांन प्रसिद्धी मिळते. अनेकांची कला आणि टॅलेंट सोशल मीडियामुळे सर्वासमोर येतं. अलिकडच्या काळात सोशल मीडिया हा अनेकांसाठी स्वत:ची कला दाखवण्याचा एक उत्तम प्लॅटफॉर्म बनला आहे.
नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक मुलगा चांगलाच चर्चेत आला आहे. या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा दिव्यांग मुलगा (Handicapped Student) बॉलिवूडच्या एका चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग (Dialogue) बोलताना दिसत आहे. बरं हा विद्यार्थी केवळ डायलॉग बोलत नसन त्या अभिनेत्याची हुबेहूब मिमिक्री (Mimicry) अर्थात नक्कल करताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी चांगलेच अवाक झाले आहेत.
पाहा व्हायरल झालेला भन्नाट व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हा दिव्यांग विद्यार्थी शाळेतील एका कार्यक्रमामध्ये आपली कला दाखवताना दिसत आहे. हा विद्यार्थी अभिनेता नाना पाटेकरची मिमिक्री करत आहे. त्याने अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आवाज त्यांची हूबेहूब नक्कल केली आहे. या विद्यार्थ्यानं नाना पाटेकर यांचा भला मोठा डायलॉग सरसकट बोलत सगळ्यांना चकित केलं.
हा व्हायरल व्हिडीओ 'THE HRX' नावाच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. अनेक युजर्सने या मुलाच्या कलेची प्रशंसा करत त्याला शाबासकीची थाप दिली आहे. तर हजारो जणांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.
संबंधित इतर बातम्या