Trending Video : लाडक्या कुत्र्याची जंगी बर्थडे पार्टी; 100 किलोचा केक, पाच हजारहून अधिक पाहुणे
Viral Video : एका कुत्र्याच्या वाढदिवसाचा चक्क 100 किलोचा केक कापण्यात आला आहे. एऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. यासाठी ही व्हिडीओ पाहा.
Dog Birthday Viral Video : काही जणांचा आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांवर प्रचंड प्रेम असतं. त्यांच्यासाठी ते काहीही करु शकतात. असंच काहीसं कर्नाटकमध्ये पाहायला मिळालं आहे. कुणी स्वत:च्या मुलांच्या वाढदिवसालाही एवढा मोठा केक ऑर्डर करणार नाही, जेवढ्या आकाराचं केक या व्यक्तीनं आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी केला आहे. या व्यक्तीनं कुत्र्याच्या वाढदिवसासाठी चक्क 100 किलोचा केक मागवला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्नाटकमध्ये आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 100 किलोंचा केक मागवला. कर्नाटकमधील बेलगाम येथील हा व्हायरल व्हिडीओ आहे. मुदालगी तालुक्यातील तुक्कनट्टी गावामध्ये ही जंगी बर्थडे पार्टी पार पडली. तुक्कनट्टी गावातील ग्रामपंचायत सदस्य शिवप्पा मरडी यांनी त्यांचा पाळीव कुत्रा 'कृष' याचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला. शिवप्पा यांनी कृषच्या वाढदिवसासाठी 100 किलोंचा केक मागवत 5 हजार लोकांना मेजवानीही दिली.
व्हायरल व्हिडीओ पाहा.
A man threw an extravagant #birthdayparty for his #petdog by cutting a 100 kg cake and feeding 4000 people with veg & non veg food in Mudalagi taluk #Belagavi #Karnataka. Later, Shivappa Mardi along with his dog Krish went on a procession with a music band. pic.twitter.com/NPX1M5iKk8
— Imran Khan (@KeypadGuerilla) June 23, 2022
लाडका कुत्रा 'कृष' त्याचा वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीमध्ये रेशमी शाल आणि टोपी घातलेला दिसला. मालक शिवप्पा यांनी कृषसोबत हा केक कापला. मात्र यावेळी कुत्रा कृष याला मात्र आपल्या आजूबाजूला काय होत आहे, याबाबत काहीच कल्पना नव्हती. कृषच्या वाढदिवसानिमित्त शिवप्पा यांनी पाच हजारहून अधिक जणांना मेजवानीही दिली.
वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या गावातील सुमारे 5 हजार लोकांना 3 क्विंटल चिकन, 1 क्विंटल अंडी आणि 50 किलो शाकाहारी जेवण देण्यात आले. कुत्र्याचे मालक शिवप्पा मार्डी हे गेल्या 20 वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. कुत्र्याचा वाढदिवस एवढ्या मोठ्या थाटात साजरा करण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे एकदा एका नवीन सदस्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्या सदस्यांचा अपमान केला आणि आपल्या कार्यकाळात कुत्र्यासारखे खाल्ले अशी टिप्पणी केली. सदस्याच्या टिप्पण्यांना प्रतिसाद देण्यासाठी, शिवप्पाने आपल्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस आलिशान पार्टी देऊन साजरा केला.
संबंधित इतर बातम्या