Viral Video : आजीबाई जोरात! विषारी सापाला पकडत गावाबाहेर फेकलं
Bear Grylls Grandmother : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी सापाला पकडत गावातील वस्तीपासून दूर घेऊन जाताना दिसत आहे.
Grandmother Viral Video : रिमझिम पाऊस सुरु झाल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात मात्र लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात विषारी सापांचं (Snake) संकट पाहायला मिळतं. अनेकदा विषारी साप घरांमध्ये शिरून अडगळीच्या भागात लपून राहतात. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सापांपासून सावध राहावं लागतं. सापाच्या भीतीनं अनेकांची तर झोपचं उडते.
अनेकदा साप आढळल्यावर लोक सर्प मित्रांना बोलावून सापाची आणि गावकऱ्यांची सुटका करुन घेतात. सामान्य माणसं सापाच्या जवळ जाण्यापासून प्रचंड घाबरतात. साप चावण्याची भीती असते. विषारी साप चावल्याने मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जण सापापासून दूरच पळतात.
पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक आजी सापाला पकडून दूर फेकताना दिसत आहेत. हो हे ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. त्यासाठी तुम्हीही हा व्हायरल झालेला व्हिडीओ नक्की पाहा.
पाहा व्हायरल व्हिडीओ
View this post on Instagram
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक वृद्ध महिला हातांनी विषारी साप पकडून घरातून बाहेर काढताना दिसत आहे. हे पाहून प्रत्येकाला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जात आहे.
सापाला न घाबरता गावातून बाहेर काढलं
व्हिडीओमध्ये दिसणारी वृद्ध महिला सापाला त्याच्या शेपटीने पकडून घरातून बाहेर काढताना दिसत आहे. यादरम्यान सापाने फणा पसरवणाऱ्या महिलेवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरतो. व्हिडीओच्या शेवटी ती महिला त्या सापाला गावाबाहेर वाहणाऱ्या नदीत फेकताना दिसत आहे.
संबंधित इतर बातम्या