PM Modi Meets Bageshwar Baba : पंतप्रधान मोदी बागेश्वर महाराजांच्या दरबारात? सोशल मीडियावर फोटो व्हायरल, खरं काय?
Fact Check : पंतप्रधान मोदी यांनी बागेश्वर महाराजांच्या दरबारात हजेरी लावल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमागचं सत्य काय जाणून घ्या.
PM Modi Meets Baba Bageshwar : गेल्या दिवसांपासून बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) उर्फ धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) प्रचंड चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शास्त्रींना आव्हान दिलं आणि वाद चिघळला. या बाबांच्या दरबारात अनेक दिग्गज नेते हजेरी लावतात. आता याच बागेश्वर महाराजांच्या (Bageshwar Dham) दरबारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हजेरी लावल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. बागेश्वर महाराजांच्या दरबारातील पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
पंतप्रधान मोदी बागेश्वर महाराजांच्या दरबारात?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये आणि काही यूट्यूब चॅनेलच्या थंबनेलवर असा दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धामला पोहोचले आणि त्यांनी बागेश्वर धाम महाराजांच्या दरबारात हजेरी लावली. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) या भारत सरकारच्या संस्थेने त्याची दखल घेऊन याची चौकशी केली आणि तपासाअंती हे दावे खोटे असल्याचे निष्पन्न झालं आहे.
PIB फॅक्ट चेक :
सोशल मीडिया पर शेयर किए जा रहे एडिटेड वीडियोज़ में दावा किया जा रहा है कि प्रधानमंत्री @narendramodi बागेश्वर धाम पहुंचे थे।#PIBFactCheck:
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 8, 2023
▶️ ये वीडियोज़ फ़र्ज़ी हैं।
▶️ प्रधानमंत्री बागेश्वर धाम नहीं गए थे। pic.twitter.com/BoXWug4HVe
पंतप्रधानांच्या व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेंज यामुळे बागेश्वर महाराजांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांच्या दरबाराची सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी बागेश्वर महाराजांच्या दरबारात हजेरी लावल्याचे फोटो आणि व्हिडीओ खोटं असल्याचं PIB फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे. हे फोटो आणि व्हिडीओ एडिट केलेले आहेत.
पंतप्रधानांच्या व्हायरल फोटोवर बागेश्वर महाराज काय म्हणाले?
या प्रकरणी पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ जारी करून असे खोटे दावे करणाऱ्यांना इशारा दिला आहे. बागेश्वर धामसंबंधी फक्त अधिकृत यूट्यूब चॅनलवरील माहिती सत्य मानली जावी, इतर वाहिन्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे सत्य असेलच असे नाही, असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री
धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बागेश्वर धाममध्ये पोहोचले आहेत असा दावा काही खोडकर एडिटेड पोस्ट आणि व्हिडीओमधून करण्यात येत करत असल्याची माहिती समोर आली आहे. असे व्हिडीओ त्वरित हटवण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :