Lottery News : दुबईत राहणाऱ्या दोन भारतीयांचं नशीब उजळलं, जिंकली 21 लाखांची लॉटरी
Lottery Draw : संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या दोन भारतीयांनी लॉटरीमध्ये लाखो रुपये जिंकले आहेत.
![Lottery News : दुबईत राहणाऱ्या दोन भारतीयांचं नशीब उजळलं, जिंकली 21 लाखांची लॉटरी indian win more than 21 lakh lottery draw in dubai lottery news Lottery News : दुबईत राहणाऱ्या दोन भारतीयांचं नशीब उजळलं, जिंकली 21 लाखांची लॉटरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/22/2fb75d57a9385c0fd6626fc591d75ba3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dubai Lottery News : कुणाचं नशीब कधी पालटेल काही सांगता येत नाही. जगात असेही काही लोक आहे, ज्यांचं अचानक नशीब उजळलं आणि ते एका रात्रीत करोडपती झाले. दुबईमध्ये राहणाऱ्या दोन भारतीयांचं नशीब असंच उजळलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) राहणाऱ्या दोन भारतीयांनी लॉटरीमध्ये लाखो रुपये जिंकले आहेत. श्रीमंत होण्याची इच्छा असल्याने अनेक लोक लॉटरीची तिकीटं खरेदी करतात. अनेक जण आयुष्यभर तिकिटं खरेदी करत राहतात. तर काही जणांचं नशीब पाजळतं आणि ते कोट्याधीश बनतात. अशीच काहीशी स्वप्नपूर्ती दुबईमध्या राहणाऱ्या दोन भारतीयांची झाली आहे.
संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहणाऱ्या दोना भारतीयांना दुबईतील 90 वया महजूज साप्ताहिक लॉटरीमध्ये 100,000 दिरहम म्हणजेच 21 लाख 75 हजार 276 रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे. डेव्हिड आणि रॉबर्ट या दोघांनी शनिवारी 20 ऑगस्ट रोजी महजूज साप्ताहिक लाईव्ह ड्रॉमध्ये 21 लाखांची रक्कम जिंकली आहे.
रॉबर्टलाही लॉटरी जिंकल्याचा आनंद
55 वर्षीय लॉटरी विजेता रॉबर्ट दुबईतील एका खाजगी कंपनीसाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात आणि गेल्या 20 वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहतात रॉबर्टही आपल्या विजयाने खूप खूश आहेत. त्यांनी सांगितलं की, लॉटरी जिंकल्याने त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यात मदत होईल. डेव्हिड यांनी सांगितलं की, त्यांनी अद्याप या बक्षीसाच्या रकमेच्या गुंतवणुकीबाबत योजनांचा विचार केलेला नाही. तर,
दुबईत राहणाऱ्या दोन भारतीयांना बंपर लॉटरी
गेल्या सहा वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणारे 39 वर्षाय डेव्हिड UAE बँकेचे माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड 2021 पासून साप्ताहिक ड्रॉमध्ये भाग घेतात. यावेळी त्यांना लॉटरी लागली. त्यानंतर डेव्हिड खूप आनंदी आहेत. डेव्हिड यांनी खलीज टाईम्सला सांगितले की, लॉटरी जिंकल्याने मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. यामुळे आमचं स्वप्न पूर्ण नक्की पूर्ण होईल.
दोन वर्षांत अनेक लोक करोडपती झाले
महजूज साप्ताहिक लकी ड्रॉद्वारे अवघ्या दोन वर्षांत 27 लोक करोडपती झाले आहेत. आतापर्यंत, महजूज लकी ड्रॉच्या विजेत्यांमध्ये भारतातील 50,000 हून अधिक लोकांचा समावेश आहे. त्यापैकी 3000 हून अधिक स्पर्धकांनी प्रथम आणि द्वितीय पारितोषिकं जिंकली आहेत. 10 दशलक्ष दिरहम (रु. 21,66,05,362) च्या पुढील ड्रॉचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) 27 ऑगस्ट रोजी रात्री 9 PM UAE वेळेनुसार (10:30 PM IST) केलं जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)