ABP Majha Top 10, 12 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील कर्मचारी पुन्हा एकदा संपावर; प्रवाशांना भरावा लागतोय मोठा भुर्दंड
समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. परिणामी त्याच्या फटका हा या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे. Read More
Vidarbha Weather Update: विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा! राज्यात वाशिम सर्वाधिक उष्ण, पारा 35 अंशावर
Vidarbha: विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 35 अंश सेल्सिअसच्या आकडा पार केला आहे. आज मंगळवारी विदर्भात वाशिम जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान तर त्या खालोखाल यवतमाळमध्ये नोंद झाली आहे. Read More
Who Is Nayab Saini : कोण आहेत नायब सिंह सैनी? हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, खट्टरांच्या निकटवर्तीयांवर भाजपचा विश्वास
Haryana CM Nayab Singh Saini : भाजपचे नायब सिंह सैनी हे आता हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. सैनी खट्टरांचे निकटवर्तीय मानले जातात. कोण आहेत हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, वाचा सविस्तर... Read More
मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर
Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More
Shoaib Malik And Sana Javed : सानियाला सोबत ठेवून चार लग्नं केली तर गैर काय? अभिनेत्रीचा शोएबला पाठिंबा
Sania Mirza Shoaib Malik And Sana Javed : शोएब-सनाच्या लग्नाला दोन महिने झाल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री हिरा सुमरोने शोएब मलिकला पाठिंबा दिला आहे. Read More
Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची सोशल पोस्ट व्हायरल; पत्नीच्या प्रेग्नंसीबाबत मौन सोडलं
Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला यांची आई चरण कौर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे Read More
Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More
India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!
India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More
Lifestyle : आई गं किती सोज्वळ! सलवार सूटच्या 'या' डिझाइन्स सिंपल लूकसाठी बेस्ट, साधे पण आकर्षक दिसाल
Lifestyle Simple Dress : जर तुम्ही साध्या लूकसाठी सलवार सूटमध्ये काहीतरी नवीन घालण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.. Read More
सेन्सेक्स- निफ्टी ग्रीन तुमचा पोर्टफोलिओ 'लाल' का?
आता पोर्टफोलिओ ५०% नुकसान मध्ये आहे... आपण आपल्या मनाची समजूत काढायला बोलत असतो , फंडामेंटल चांगले आहेत. Read More